सेवाकार्यासाठी तयार व्हा
चर्चेसाठी नमूने
स्मारकविधीचं आमंत्रण द्यायची मोहीम (१९ मार्च ते १५ एप्रिल)
“आम्ही तुम्हाला एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण देत आहोत. या कार्यक्रमाला जगभरातले लाखो लोक उपस्थित असतील. हा कार्यक्रम येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी आहे.” घरमालकाला आमंत्रण पत्रिका द्या किंवा ती पत्रिका मेसेज किंवा ई-मेलने पाठवा. “या क्रार्यक्रमाचं ठिकाण आणि वेळ पत्रिकेत दिली आहे [किंवा ऑनलाईन कसं पाहता येईल, ते दिलं आहे]. यासोबतच आम्ही या कार्यक्रमाच्या, आधीच्या आठवड्यात होणाऱ्या एका भाषणाचं आमंत्रणही तुम्हाला देत आहोत.”
आवड दाखवली तर: येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा हा व्हिडिओ दाखवा किंवा [मेसेजने पाठवा].
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: येशूला का मरावं लागलं?
पहिली भेट * (१-१८ मार्च, १६-३० एप्रिल)
प्रश्न: हॉस्पिटलमध्ये काम करणारे लोक इतरांना मदत करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?
वचन: योह १५:१३
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: कोणी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला निःस्वार्थपणे मदत केली आहे का?
पुनर्भेट *
प्रश्न: कोणी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला निःस्वार्थपणे मदत केली आहे का?
वचन: मत्त २०:२८
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: ज्याने आपल्या सगळ्यांसाठी जीव दिला, त्याच्या मृत्यूच्या आठवणीत होणाऱ्या एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण मी तुम्हाला दिलं तर चालेल का?