१४-२० मार्च
१ शमुवेल १४-१५
गीत ६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१शमु १५:२४—शौलने अमालेकी लोकांना दया दाखवून जी चूक केली त्यातून आपण कोणता धडा शिकतो? (टेहळणी बुरूज१७.०९ १० ¶१०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १शमु १५:१-१६ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: इतरांना मदत करा—मत्त २०:२८ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास ३)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. बायबल अभ्यास कसा चालवला जातो? या व्हिडिओबद्दल सांगा आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
शनिवार, १९ मार्चपासून स्मारकविधीच्या मोहीमेची सुरूवात: (१० मि.) चर्चा. आमंत्रण पत्रिकेची थोडक्यात उजळणी करा. खास भाषण आणि स्मारकविधीच्या व्यवस्थेबद्दल आणि तुमच्या मंडळीच्या क्षेत्रात आमंत्रण पत्रिकेची मोहीम कशी चालवली जाईल त्याबद्दल सांगा. नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवून त्यावर चर्चा करा.
यहोवाचे मित्र बना—यहोवाचं ऐका: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) ऐका आणि जीवन जगा! भाग ५ आणि ६
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ५ आणि प्रार्थना