ख्रिस्ती जीवन
सर्व समस्या एक दिवस नक्कीच संपतील
समस्या जेव्हा बऱ्याच काळापर्यंत राहतात तेव्हा आपण खूप जास्त निराश होऊ शकतो. दावीदला माहित होतं की शौल राजामुळे त्याच्यावर आलेली संकटं एक न् एक दिवस नक्की संपतील. आणि यहोवाने वचन दिल्याप्रमाणे तो राजा बनेल. (१शमु १६:१३) दावीदला विश्वास होता की यहोवा त्याची परिस्थिती बदलेल आणि म्हणून त्याने धीर धरला.
जेव्हा आपण समस्येत असतो तेव्हा समजबुद्धीचा आणि विचारशक्तीचा वापर करून आपण परिस्थिती कदाचित बदलू शकतो. (१शमु २१:१२-१४; नीत १:४) पण कधीकधी बायबल तत्त्वांप्रमाणे समस्या सोडवायचा प्रयत्न करूनही त्या तशाच राहतात. अशा वेळेस आपण धीर धरला पाहिजे आणि यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे. लवकरच यहोवा या सर्व समस्या काढून टाकेल आणि आपल्या “डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.” (प्रक २१:४) आपल्या काही समस्या आज यहोवाच्या मदतीमुळे किंवा इतर कारणांमुळे निघून जाऊ शकतात. पण एका गोष्टीची आपल्याला पूर्ण खातरी आहे. ती म्हणजे, सर्व समस्या एक दिवस नक्कीच संपतील. यामुळे आपल्याला खूप दिलासा मिळतो.
विभागलेल्या जगात ऐक्याने राहणारे लोक हा व्हिडिओ पाहा आणि मग पुढे दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
-
दक्षिण अमेरिकेतल्या काही भाऊबहिणींना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला?
-
त्यांनी कशा प्रकारे धीर धरला आणि प्रेम दाखवलं?
-
“जास्त महत्त्वाच्या” गोष्टी करण्यासाठी त्यांना कशामुळे मदत झाली?—फिलि १:१०