व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

यहोवावर भरवसा ठेवण्याचे तीन मार्ग

यहोवावर भरवसा ठेवण्याचे तीन मार्ग

दावीदचा यहोवावर भरवसा असल्यामुळे तो गल्याथला हरवू शकला. (१शमु १७:४५) यहोवा आपल्या सेवकांना मदत करण्यासाठी त्याच्या शक्‍तीचा वापर करायला नेहमी तयार असतो. (२इत १६:९) आपण स्वतःच्या अनुभवांवर आणि क्षमतांवर भरवसा ठेवण्याऐवजी यहोवा देत असलेल्या मदतीवर कसा भरवसा ठेवू शकतो? यासाठी पुढे तीन मार्ग दिले आहेत:

  • नेहमी प्रार्थना करा. चूक होते फक्‍त तेव्हाच यहोवाकडे क्षमेसाठी प्रार्थना करू नका. तर तुम्हाला जेव्हा एखादी वाईट गोष्ट करण्याचा मोह होतो तेव्हासुद्धा तिचा सामना करण्यासाठी यहोवाकडे मदत मागा. (मत्त ६:१२, १३) कधीकधी आपण आधी निर्णय घेतो आणि मग त्यावर यहोवाकडे आशीर्वाद मागतो. पण निर्णय घेण्याआधीसुद्धा  बुद्धी आणि मार्गदर्शनासाठी यहोवाकडे प्रार्थना करा.—याक १:५

  • बायबल वाचनाची आणि अभ्यासाची सवय लावा. दररोज बायबल वाचा. (स्तो १:२) बायबलच्या उदाहरणांवर मनन करण्यासाठी वेळ काढा आणि शिकलेल्या गोष्टी लागू करा. (याक १:२३-२५) सेवाकार्यासाठी स्वतःच्या अनुभवांवर अवलंबून न राहता त्यासाठी चांगली तयारी करा. तसंच, मंडळीच्या सभांमधून पूर्णपणे फायदा घेण्यासाठी आधीच तयारी करा

  • यहोवाच्या संघटनेच्या आधीन राहा. यहोवाच्या संघटनेकडून मिळणारं नवीन मार्गदर्शन काय आहे याची माहिती ठेवा आणि त्याचं लगेच पालन करा. (गण ९:१७) तसंच, मंडळीतल्या वडिलांकडून मिळणाऱ्‍या सल्ल्यांचं आणि सूचनांचंही पालन करा.—इब्री १३:१७

छळ झाला तरी घाबरण्याची गरज नाही  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

• भाऊबहिणींना कोणत्या गोष्टींची भीती वाटत होती?

• त्यांना ज्या गोष्टींची भीती वाटत होती त्यांवर मात करायला त्यांना कशामुळे मदत झाली?