व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दावीद गल्याथसमोर उभा आहे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

“हे युद्धं यहोवाचं आहे”

“हे युद्धं यहोवाचं आहे”

यहोवाबद्दल असलेल्या ज्ञानामुळे आणि अनुभवांमुळे दावीदचा यहोवावर पूर्ण विश्‍वास होता (१शमु १७:३६, ३७; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६, क्र.४ ११ ¶२-३)

गल्याथ किती धिप्पाड आहे असा विचार न करता, तो यहोवासमोर किती छोटा आहे असा विचार दावीदने केला (१शमु १७:४५-४७; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६, क्र. ४ ११-१२)

दावीदला एका शक्‍तिशाली शत्रूवर विजय मिळवायला यहोवाने मदत केली (१शमु १७:४८-५०; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६, क्र. ४ १२ ¶४; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

कधीकधी आपल्याला कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जसं की, आपला छळ होऊ शकतो किंवा आपल्याला वाईट सवय असू शकते. जेव्हा या समस्या खूप मोठ्या वाटतात तेव्हा लक्षात असू द्या, की यहोवा खूप शक्‍तिशाली आहे आणि त्या समस्या त्याच्यासमोर खूप छोट्या आहेत.—ईयो ४२:१, २.