व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

यहोवासोबत जवळचं नातं जोडायला तुमच्या बायबल विद्यार्थ्याला मदत करा

यहोवासोबत जवळचं नातं जोडायला तुमच्या बायबल विद्यार्थ्याला मदत करा

यहोवाची इच्छा आहे की आपण त्याची सेवा प्रेमापोटी करावी. (मत्त २२:३७, ३८) देवावर प्रेम असल्यामुळेच बायबल विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात बदल करता येतील आणि ते परीक्षांचा सामना करू शकतील. (१यो ५:३) आणि याच प्रेमामुळे त्यांना बाप्तिस्मा घ्यायची प्रेरणा मिळेल.

देवाचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे विद्यार्थ्यांना समजायला मदत करा. हे करण्यासाठी त्यांना असे प्रश्‍न विचारा: “यावरून तुम्हाला यहोवाबद्दल काय शिकायला मिळालं?” किंवा “देवाचं तुमच्यावर प्रेम आहे हे यावरून तुम्हाला कसं कळतं?” यहोवा त्यांच्या वैयक्‍तिक जीवनात कशी मदत करत आहे हे समजायला त्यांना मदत करा. (२इत १६:९) तुम्ही विशिष्ट गोष्टीसाठी केलेल्या प्रार्थनेचं उत्तर यहोवाने कसं दिलं याचा अनुभव तुमच्या विद्यार्थ्यांना सांगा. आणि यहोवा त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर कसं देतो याकडे लक्ष द्यायचं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या. आपले बायबल विद्यार्थी यहोवावर प्रेम करू लागतात आणि त्याच्यासोबत त्यांचं नातं मजबूत होत जातं, तेव्हा ते पाहून आपल्याला खूप आनंद होतो.

यहोवासोबत जवळचं नातं जोडायला तुमच्या बायबल विद्यार्थ्याला मदत करा  हा व्हिडिओ पाहा आणि मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • जेडसमोर कोणती समस्या होती?

  • नीताने जेडची मदत कशी केली?

  • जेड त्या समस्येचा सामना कशी करू शकली?