व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

वाईट सवयी सोडायला तुमच्या विद्यार्थ्याला मदत करा

वाईट सवयी सोडायला तुमच्या विद्यार्थ्याला मदत करा

यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत करण्यासाठी आपल्याला नैतिक रीत्या शुद्ध राहणं गरजेचं आहे. (१पेत्र १:१४-१६) बायबल विद्यार्थी जेव्हा त्याच्या वाईट सवयी सोडून देतो तेव्हा त्याला बरेच फायदे होतात. जसं की, त्याचं कुटुंब आनंदी राहतं, त्याची तब्येत चांगली राहते आणि पैसे वाचल्यामुळे त्याला आर्थिक बाबतींतही फायदा होतो.

यहोवाचे नैतिक स्तर काय आहेत, आपण त्यांचं पालन का केलं पाहिजे आणि त्यांमुळे कोणते फायदे होतात हे आपल्या बायबल विद्यार्थ्याला सांगा. विद्यार्थ्याला त्याची विचार करण्याची पद्धत बदलायला मदत करा. यामुळे त्याला यहोवाच्या स्तरांप्रमाणे वागायला मदत होईल. (इफि ४:२२-२४) यहोवाच्या मदतीने तो बऱ्‍याच वर्षांपासून असलेल्या त्याच्या वाईट सावयींवर मात करू शकेल  याची त्याला खातरी करून द्या. (फिलि ४:१३) वाईट गोष्टी करण्याचा मोह होतो तेव्हा यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना करायला त्याला शिकवा. कोणकोणत्या परिस्थितींत या गोष्टी करायचा मोह होऊ शकतो हे त्याला ओळखायला शिकवा. वाईट सवयींच्या जागी त्याला चांगल्या सवयी लावायचं प्रोत्साहन द्या. यहोवाच्या मदतीने विद्यार्थी स्वतःमध्ये बदल करतात तेव्हा ते पाहून आपल्याला खूप आनंद होतो.

वाईट सवयी सोडायला तुमच्या विद्यार्थ्याला मदत करा  हा व्हिडिओ पाहा आणि मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • मंडळीतल्या वडिलांनी आणि नीताने जेडवर कसा भरवसा दाखवला?

  • नीताने जेडला आणखी मदत कशी केली?

  • जेडने यहोवाकडे मदत कशी मागितली?