व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

तुमचे ऑनलाईन मित्र कोण आहेत?

तुमचे ऑनलाईन मित्र कोण आहेत?

खऱ्‍या मित्रांमध्ये एक जवळीक असते आणि ते एकमेकांचा आदर करतात. उदाहरणार्थ, दावीद आणि योनाथान यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. दावीदने गल्याथला मारलं, तेव्हापासून ते चांगले मित्र बनले. (१शमु १८:१) त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांमुळे ते एकमेकांचे चांगले मित्र बनू शकले. आपण समोरच्या व्यक्‍तीला चांगल्या प्रकारे ओळखत असू तर आपली तिच्याशी घट्ट मैत्री होऊ शकते. एखाद्या व्यक्‍तीला जाणून घेण्यासाठी सहसा वेळ द्यावा लागतो आणि स्वतःहून प्रयत्न करावा लागतो. पण इंटरनेटमुळे मित्र बनवणं आज फार सोपं झालं आहे. इंटरनेटवर सहसा लोक आपली ओळख लपवतात. ते खरोखर कशा प्रकारची व्यक्‍ती आहेत हे आपल्याला लगेच कळत नाही. म्हणून, जर तुम्ही ऑनलाईन मित्र निवडत असाल तर ते विचार करून निवडा. एखाद्याला तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत नसाल, तर त्याने पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट नाकारायला घाबरू नका. असं केल्यामुळे त्या व्यक्‍तीला वाईट वाटेल असा विचार करू नका. इंटरनेटवर मैत्री करायचे बरेचसे धोके आहेत, हे पाहून काही जणांनी सोशल मिडियाचा वापर न करायचं ठरवलं आहे. पण तुम्ही जर सोशल मिडियाचा वापर करायचं ठरवत असाल तर तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा  हा व्हिडिओ पाहा आणि मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • फोटो आणि कमेंट्‌स इंटरनेटवर टाकण्याआधी आपण कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

  • ऑनलाईन मित्र निवडताना आपण काळजी का घेतली पाहिजे?

  • सोशल मिडियावर आपण किती वेळ घालवणार आहोत हे आपण आधीच का ठरवलं पाहिजे?—इफि ५:१५, १६