सेवाकार्यासाठी तयार व्हा
चर्चेसाठी नमुने
स्मारकविधीच्या आमंत्रणाची मोहीम (११ मार्च–४ एप्रिल)
“आम्ही तुम्हाला एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी आलो आहोत. हा येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी आहे आणि या कार्यक्रमाला जगभरातले लाखो लोक उपस्थित राहणार आहेत.” घरमालकाला आमंत्रण पत्रिकेची छापील किंवा इलेक्ट्रॉनिक प्रत द्या. “या क्रार्यक्रमाचं ठिकाण आणि वेळ पत्रिकेत दिली आहे. यासोबतच आम्ही या कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात होणाऱ्या एका भाषणाचं आमंत्रणही तुम्हाला देत आहोत.”
आवड दाखवली तर: येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा हा व्हिडिओ दाखवा. [किंवा त्याची लिंक मेसेजने किंवा ई-मेलने पाठवा.]
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: येशूने आपलं जीवन बलिदान म्हणून का दिलं?
पहिली भेट (१-१० मार्च, ५-३० एप्रिल)
प्रश्न: हॉस्पिटल, अग्नीशामक दल अशा ठिकाणी काम करणारे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना मदत करतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं?
वचन: योह १५:१३
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: कोणी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला निःस्वार्थपणे मदत केली आहे का?
पुनर्भेट
प्रश्न: कोणी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला निःस्वार्थपणे मदत केली आहे का?
वचन: मत्त २०:२८
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: ज्याने आपल्या सगळ्यांसाठी त्याच्या जीवनाचं बलिदान दिलं, त्याच्या मृत्यूच्या आठवणीत होणाऱ्या एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण मी तुम्हाला दिलं तर चालेल का?