ख्रिस्ती जीवन
दररोज बायबल वाचा आणि देवाकडून असलेली बुद्धी मिळवा
देवाकडून मिळणारी बुद्धी गुप्त खजिन्यासारखी मौल्यवान आहे. (नीत २:१-६) ही बुद्धी आपल्याला समंजसपणा दाखवायला आणि योग्य निर्णय घ्यायला मदत करते. ती आपलं संरक्षण करते. म्हणूनच बायबल म्हणतं, की “बुद्धीच सर्वात महत्त्वाची आहे.” (नीत ४:५-७) देवाच्या वचनात लपलेली मौल्यवान रत्नं शोधण्यासाठी आपल्याला मेहनत घेण्याची गरज आहे. हे आपण कसं करू शकतो? त्यासाठी सगळ्यात आधी आपण दररोज बायबल वाचलं पाहिजे. (यहो १:८) नियमितपणे बायबल वाचण्यासाठी आणि त्यातून आनंद मिळवण्यासाठी तुम्ही काय-काय करू शकता ते पाहा.
यांना देवाच्या वचनाची गोडी लागली, हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या:
या तरुणांना दररोज बायबल वाचनं का कठीण जात होतं? आणि त्यांना कशामुळे मदत झाली?
-
मेलेनी
-
सॅम्युल
-
सिलीन
-
रफायलो
माझ्या बायबल वाचनाचा आराखडा: