ख्रिस्ती जीवन
बायबल अभ्यासासाठी बनवण्यात आलेल्या व्हिडिओंचा कसा वापर करावा
बायबल अभ्यासाची माहिती देणारे चार व्हिडिओ आपल्याकडे आहेत. यातला प्रत्येक व्हिडिओ कोणत्या कारणासाठी बनवला आहे?
-
बायबलचा अभ्यास का करावा?—पूर्ण व्हिडिओ: हा व्हिडिओ एखाद्या व्यक्तीमध्ये बायबलबद्दल आवड निर्माण करण्यासाठी बनवण्यात आला आहे; मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची असो. जीवनातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं बायबलमध्ये कशी देण्यात आली आहेत, हे पाहण्यासाठी या व्हिडिओत उत्तेजन देण्यात आलंय. आणि ही उत्तरं तर्काला पटणारी कशी आहेत, याचं एक उदाहरणही या व्हिडिओत दिलं आहे. शिवाय, बायबल अभ्यासाची विनंती कशी करायची हेसुद्धा या व्हिडिओत सांगण्यात आलंय.
-
बायबलचा अभ्यास का करावा? (संक्षिप्त भाग): हा व्हिडिओसुद्धा पूर्ण व्हिडिओसारखाच आहे. फरक इतकाच, की पूर्ण व्हिडिओ जवळजवळ साडेतीन मिनिटांचा आहे, पण हा व्हिडिओ जवळजवळ दिड मिनिटांचा आहे. जेव्हा लोक घाईत असतात तेव्हा खासकरून हा व्हिडिओ वापरला जाऊ शकतो.
-
बायबल अभ्यास कसा चालवला जातो?: मोफत बायबल अभ्यासाबद्दल लोकांच्या मनात आवड निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तसंच, बायबल अभ्यासाची विनंती कशी करायची यासारख्या सहसा विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरंही यात दिलेली आहेत.
-
चला, बायबलमधून शिकू या!: हा व्हिडिओ बायबल विद्यार्थ्याला दाखवण्यासाठी बनवण्यात आलाय. या व्हिडिओबद्दल कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाच्या दुसऱ्या पानावर सांगण्यात आलंय. पण कायम जीवनाचा आनंद घ्या! या माहितीपत्रकातून अभ्यास घेतानासुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ दाखवता येईल. या व्हिडिओमध्ये पुस्तकात कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली जाईल आणि ही चर्चा कशा प्रकारे होईल याबद्दल सांगण्यात आलंय.
या प्रत्येक व्हिडिओचा एक खास उद्देश असला, तरी यापैकी कोणताही व्हिडिओ गरजेप्रमाणे केव्हाही दाखवला जाऊ शकतो किंवा त्याची लिंक पाठवली जाऊ शकते. प्रचारकांना असं प्रोत्साहन दिलं जातं, की त्यांनी या व्हिडिओंमध्ये काय सांगितलंय ते चांगल्या प्रकारे माहीत करून घ्यावं आणि सेवेत त्यांचा चांगला वापर करावा.