२०-२६ मार्च
२ इतिहास १-४
गीत ४१ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“शलमोन राजा चुकीचा निर्णय घेतो”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२इत १:११, १२—आपल्या व्यक्तिगत प्रार्थनांबद्दल आपल्याला या अहवालातून काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०५ १२/१ १९ ¶६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २इत ४:७-२२ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
स्मारकविधीचं आमंत्रण: (३ मि.) पूर्वी आवड दाखवलेल्या कामावरच्या किंवा शाळेतल्या सोबत्याला किंवा एखाद्या नातेवाइकाला आमंत्रण द्या. (शिकवणे अभ्यास २)
पुनर्भेट: (४ मि.) बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या, तसंच स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलेल्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा. मोफत बायबल अभ्यासाबद्दल त्याला सांगा आणि आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या. बायबल अभ्यास कसा चालवला जातो? या व्हिडिओबद्दल सांगा आणि चर्चा करा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास १७)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०९ मुद्दा ५ (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
वर्षातल्या सगळ्यात महत्त्वाच्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात का?: (१५ मि.) भाषण आणि व्हिडिओ. हा भाग सेवा पर्यवेक्षकांनी हाताळावा. स्मारकविधीची मोहीम तुमच्या मंडळीच्या क्षेत्रात कशी चालू आहे ते सांगा. ज्यांना चांगला अनुभव आला आहे त्यांची मुलाखत घ्या. पान ८ आणि ९ वर स्मारकविधीसाठी असलेल्या बायबल वाचनाच्या आराखड्याची आठवण करून द्या आणि या खास कार्यक्रमासाठी भाऊबहिणींना त्यांचं मन तयार करायला सांगा. (एज ७:१०) स्मारकविधीसाठी येणाऱ्या पाहुण्यांचं कसं स्वागत करता येईल यावर चर्चा करा. (रोम १५:७; सभेसाठी कार्यपुस्तिका१६.०३ २) स्मारकविधीची भाकर कशी तयार करायची? हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १४ ¶१-७, सुरवातीचा व्हिडिओ
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २३ आणि प्रार्थना