ख्रिस्ती जीवन
असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
दररोज आपल्याला बरेच निर्णय घ्यावे लागतात. जगातले लोक स्वतःच्या मनाप्रमाणे किंवा बाकीचे लोक घेतात त्याप्रमाणे निर्णय घेतात. (निर्ग २३:२; नीत २८:२६) पण तेच, यहोवावर भरवसा ठेवणारे लोक त्याला विचारात घेऊन कोणताही निर्णय घेतात. म्हणजेच बायबलची तत्त्वं विचारात घेऊन ते निर्णय घेतात.—नीत ३:५, ६.
पुढे दिलेल्या प्रत्येक वचनासमोर अशी एक परिस्थिती लिहा, ज्यात त्या वचनातलं तत्त्व लागू करून चांगला निर्णय घेता येईल.
विश्वासू लोकांसारखं असा, अविश्वासू लोकांसारखं नाही—मोशेसारखं, फारोसारखं नाही, हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या:
बायबलमधल्या एका उदाहरणामुळे एका भावाला योग्य निर्णय घ्यायला कशी मदत झाली?