व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

“आपल्या हृदयाचं रक्षण कर”

“आपल्या हृदयाचं रक्षण कर”

शलमोनने देवाच्या प्रेरणेने असं लिहिलं: “ज्या गोष्टींचं तू रक्षण करतोस, त्या सर्वांपेक्षा आपल्या हृदयाचं रक्षण कर.” (नीत ४:२३) पण दुःखाची गोष्ट अशी, की देवाचे लोक म्हणजे इस्राएली लोक “पूर्ण मनाने” त्याच्या मार्गांवर चालले नाहीत. (२इत ६:१४) इतकंच काय, तर शलमोन राजासुद्धा आपल्या मूर्तिपूजक बायकांमुळे इतर देवांची उपासना करू लागला. (१रा ११:४) तुम्ही तुमच्या हृदयाचं रक्षण कसं करू शकता? जानेवारी, २०१९ च्या टेहळणी बुरूज  अंकातल्या पान १४-१९ वर असलेल्या एका अभ्यास लेखाचा हाच विषय होता.

टेहळणी बुरूज अंकातले धडे—आपल्या हृदयाचं रक्षण करा  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

खाली दिलेल्या भाऊबहिणींचा विश्‍वास कोणत्या गोष्टींमुळे कमजोर होऊ शकला असता? पण या अभ्यास लेखामुळे त्यांना कशा प्रकारे आपल्या हृदयाचं रक्षण करता आलं?

  • ब्रेन्ट आणि लोरेन

  • उमजा

  • हॅप्पी लॅयू

या अभ्यास लेखामुळे तुम्हाला कशी मदत झाली?