देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
मंदिरात उपासनेची उत्तम व्यवस्था
दावीद राजाने लेव्यांना आणि याजकांना वेगवेगळ्या गटांत विभागून मंदिरात सेवा करण्यासाठी एक चांगली व्यवस्था लावून दिली (१इत २३:६, २७, २८; २४:१, ३; इन्साइट-२ २४१, ६८६)
मंदिरात वाद्य वाजवून आणि गीत गाऊन स्तुती करण्यासाठी कुशल आणि शिकाऊ गायक तसंच वादकांना नेमण्यात आलं (१इत २५:१, ८; टेहळणी बुरूज९४ ५/१ १०-११ ¶८)
वस्तूंच्या भांडारांवर अधिकारी, द्वारपाल आणि अशा इतर जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी लेव्यांना नेमण्यात आलं (१इत २६:१६-२०; इन्साइट-१ ८९८)
यहोवा व्यवस्थेचा देव आहे म्हणून आपल्या उपासनेच्या पद्धतीतसुद्धा सुव्यवस्था आणि सुसंघटितपणा दिसून येतो—१कर १४:३३.
यावर मनन करा: आज ख्रिस्ती मंडळीत सुव्यवस्था कशी दिसून येते?