व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१५-२१ एप्रिल

स्तोत्रं २९-३१

१५-२१ एप्रिल

गीत १०८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. देवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे तो आपल्याला सुधारतो

(१० मि.)

दावीदने आज्ञा मोडल्यामुळे यहोवाने त्याच्यापासून आपलं तोंड फिरवलं (स्तो ३०:७; इन्साइट-१ ८०२ ¶३)

दावीदने पश्‍चात्ताप करून यहोवाकडे कृपेसाठी याचना केली (स्तो ३०:८)

यहोवा दावीदवर कायमचा रागावला नाही (स्तो ३०:५; टेहळणी बुरूज२०.०२ २४ ¶१८)


दावीदने इस्राएलची मोजणी करायचं पाप केल्यामुळे झालेल्या घटनांनंतर कदाचित दावीद या ३० व्या स्तोत्रात आपल्या भावना सांगत आहे.—२शमु २४:२५.

यावर मनन करा: एक बहिष्कृत झालेली व्यक्‍ती त्याला मिळालेल्या सुधारणुकीचा कसा फायदा करून घेऊ शकते आणि पश्‍चात्तापी असल्याचं कसं दाखवू शकते?—टेहळणी बुरूज२१.१० ६ ¶१८.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ३१:२३—गर्विष्ठपणे वागणाऱ्‍या व्यक्‍तीची चांगलीच परतफेड कशी होते? (टेहळणी बुरूज०६ ६/१ ५ ¶४)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(१ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. कामात व्यस्त असलेल्या एका व्यक्‍तीला थोडक्यात साक्ष द्या. (शिष्य बनवा  धडा ५ मुद्दा ३)

५. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. एका आईला मुलांसाठी असणारा एखादा व्हिडिओ दाखवा आणि तिला यासारखे आणखी व्हिडिओ कसे शोधायचे ते सांगा. (शिष्य बनवा  धडा ३ मुद्दा ३)

६. पुन्हा भेटण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. बायबल अभ्यासासाठी पूर्वी नकार दिलेल्या एका व्यक्‍तीला पुन्हा बायबल अभ्यास करायची इच्छा आहे का ते विचारा. (शिष्य बनवा  धडा ८ मुद्दा ३)

७. शिष्य बनवा

ख्रिस्ती जीवन

गीत ४५

८. आपण यावर विश्‍वास का ठेवतो . . . देवाचं प्रेम

(७ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

या अनुभवातून देवाच्या प्रेमाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?

९. स्थानिक डिझाईन/बांधकाम प्रकल्प २०२४ सालचा अहवाल

(८ मि.) भाषण. हा व्हिडिओ दाखवा.

१०. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ९९ आणि प्रार्थना