व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१८-२४ मार्च

स्तोत्रं १९-२१

१८-२४ मार्च

गीत ११ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “आकाश देवाच्या गौरवाचं वर्णन करतं”

(१० मि.)

यहोवाची सृष्टी त्याचा गौरव करते (स्तो १९:१; टेहळणी बुरूज०४ १/१ ८ ¶१-२)

यहोवाने अद्‌भुत रितीने सूर्याची निर्मिती केली आहे (स्तो १९:४-६; टेहळणी बुरूज०४ ६/१ १०-११ ¶८-१०)

आपण देवाने निर्माण केलेल्या गोष्टीतून शिकलं पाहिजे (मत्त ६:२८; सावध राहा!९५-E ११/८ ७ ¶३)


कौटुंबिक उपासनेसाठी एक कल्पना: सृष्टीचं निरीक्षण करा आणि मग त्यातून यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं यावर चर्चा करा.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १९:७-९—ही वचनं हिब्रू कवितांच्या खास पद्धतीची उदाहरणं आहेत असं का म्हणता येईल? (इन्साइट-१ १०७३)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. एखाद्याला स्मारकविधीचं आमंत्रण द्या आणि jw.org चा वापर करून समोरच्या व्यक्‍तीला जवळ असलेलं स्मारकविधीचं ठिकाण शोधा. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ३)

५. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. कोणीतरी दारात ठेवून गेलेली आमंत्रणपत्रिका पाहून स्मारकविधीला आलेल्या व्यक्‍तीचं स्वागत करा. त्याच्या प्रश्‍नांची उत्तरं द्यायची व्यवस्था करा. (शिष्य बनवा  धडा ३ मुद्दा ४)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) भाषण. सहसा विचारले जाणारे प्रश्‍न  ४५—विषय: यहोवाचे साक्षीदार प्रभुभोजनाचा विधी चर्चपेक्षा वेगळ्या पद्धतीने का पाळतात? (शिकवणे  अभ्यास ६)

ख्रिस्ती जीवन

गीत १४१

७. सृष्टीतल्या गोष्टी पाहून आपला विश्‍वास वाढवा

(१५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

सृष्टीतल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे निर्माणकर्त्यावरचा तुमचा विश्‍वास कसा वाढतो?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ११९ आणि प्रार्थना