व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१-७ एप्रिल

स्तोत्रं २३-२५

१-७ एप्रिल

गीत ४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “यहोवा माझा मेंढपाळ आहे”

(१० मि.)

यहोवा आपल्याला मार्ग दाखवतो (स्तो २३:१-३; टेहळणी बुरूज०५ ११/१ २३-२४ ¶९-१०)

यहोवा आपल्याला सुरक्षित ठेवतो (स्तो २३:४; टेहळणी बुरूज०५ ११/१ २५-२६ ¶१३-१५)

यहोवा आपलं पालनपोषण करतो (स्तो २३:५; टेहळणी बुरूज०५ ११/१ २६ ¶१७-१८)

एक प्रेमळ मेंढपाळ जसं आपल्या मेंढरांची काळजी घेतो, तसंच यहोवा आपल्या सेवकांची काळजी घेतो.

स्वतःला विचारा, ‘यहोवाने माझी काळजी कशी घेतली आहे?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो २३:३—‘नीतीचे मार्ग’ काय आहेत आणि कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला त्या मार्गांवर टिकून राहायला मदत होईल? (टेहळणी बुरूज११ २/१५ २४ ¶१-३)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. पर्यावरणाबद्दल काळजी असलेल्या एखाद्या व्यक्‍तीला बायबलमधून सांत्वन देणारं एखादं वचन दाखवा. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. कायम जीवनाचा आनंद घ्या!  माहितीपत्रक घेतलेल्या व्यक्‍तीला बायबल अभ्यास कसा चालवला जातो ते दाखवा. (शिष्य बनवा  धडा ९ मुद्दा ३)

६. शिष्य बनवा

ख्रिस्ती जीवन

गीत ५६

७. आपण अनोळखी माणसांचा आवाज ऐकत नाही

(१५ मि.) चर्चा.

मेंढरांना आपल्या मेंढपाळाचा आवाज माहीत असल्यामुळे ते त्याच्या मागोमाग जातात. पण अनोळखी माणसाचा आवाज माहीत नसल्यामुळे ते त्याच्यापासून दूर पळतात. (योह १०:५) त्याच प्रकारे, आपण आपल्या प्रेमळ आणि भरवशालायक मेंढपाळांचं म्हणजे यहोवा आणि येशूचं ऐकतो. (स्तो २३:१; योह १०:११) पण “कपटी शब्द” बोलून आपला विश्‍वास कमजोर करणाऱ्‍या अनोळखी लोकांचं आपण ऐकत नाही.—२पेत्र २:१, ३.

पृथ्वीवर पहिल्यांदा ज्या अनोळखी माणसाचा आवाज ऐकू आला त्याच्याबद्दल उत्पत्तीच्या तिसऱ्‍या अध्यायात आपल्याला वाचायला मिळतं. सैतानाने हव्वापासून आपली खरी ओळख लपवून तिला फसवलं. आपण मित्र असल्याचं भासवून त्याने तिला यहोवाबद्दल आणि त्याच्या उद्देशाबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या. वाईट गोष्ट म्हणजे, हव्वाने त्याचं ऐकलं. त्यामुळे पुढे तिला आणि तिच्या कुटुंबाला बरीच संकटं सहन करावी लागली.

आज सैतान चुकीची, नकारात्मक आणि खोटी माहिती पसरवून यहोवाबद्दल आणि त्याच्या संघटनेबद्दल आपल्या मनात शंका पेरण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जेव्हा अनोळखी माणसांचा आवाज ऐकू येतो, तेव्हा आपण तिथून पळ काढला पाहिजे. उत्सुकतेपोटी काही वेळासाठीसुद्धा तशी माहिती ऐकणं धोक्याचं आहे. विचार करा, हव्वाला फसवायला सैतानाला किती वेळ लागला? (उत्प ३:१, ४, ५) मग आपल्या जीवाभावाची आणि मनाने चांगली असलेली व्यक्‍ती जर आपल्याला यहोवाच्या संघटनेविरुद्ध काही माहिती दाखवत असेल, तर काय?

“अनोळखी माणसांचा आवाज” ऐकू नका  हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

जेडची आई जेव्हा तिला यहोवाच्या संघटनेबद्दल चुकीची माहिती सांगायचा प्रयत्न करत होती, तेव्हा जेडने ती परिस्थिती जशी हाताळली, त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५५ आणि प्रार्थना