व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२९ एप्रिल–५ मे

स्तोत्रं ३४-३५

२९ एप्रिल–५ मे

गीत १० आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “नेहमी यहोवाची स्तुती” करा

(१० मि.)

परीक्षांचा सामना करत असतानाही दावीदने यहोवाची स्तुती केली (स्तो ३४:१; टेहळणी बुरूज०७ ३/१ २४ ¶११)

दावीदने स्वतःबद्दल नव्हे तर यहोवाबद्दल बढाई मारली (स्तो ३४:२-४; टेहळणी बुरूज०७ ३/१ २५ ¶१३)

दावीदने यहोवाची स्तुती केल्यामुळे त्याच्या साथीदारांचा विश्‍वास बळकट झाला (स्तो ३४:५; टेहळणी बुरूज०७ ३/१ २६ ¶१५)

अबीमलेखपासून सुटका झाल्यानंतर दावीद रानात पळून गेला. तिथे जीवनाला कंटाळलेले ४०० लोक त्याला येऊन मिळाले. (१शमु २२:१, २) दावीदने अशाच लोकांचा विचार करून कदाचित हे गीत रचलं असावं.—स्तो ३४, उपरीलेखन.

स्वतःला विचारा, ‘पुढच्या सभेत एखाद्यासोबत बोलत असताना मी यहोवाची स्तुती कशी करू शकतो?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ३५:१९—विनाकारण द्वेष करणाऱ्‍यांना “डोळे मिचकावू देऊ नकोस” या दावीदच्या विनंतीचा काय अर्थ होता? (टेहळणी बुरूज०६ ६/१ ५ ¶६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(२ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. साक्ष देण्याची संधी मिळण्याआधीच संभाषण संपतं. (शिष्य बनवा  धडा १ मुद्दा ४)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ४)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) प्रात्यक्षिक. कायम आनंद घ्या!  धडा ४४ मुद्दे १-३—विषय: एखादा सण पाळायचा की नाही हे यहोवाचे साक्षीदार कसं ठरवतात? (शिकवणे  अभ्यास १७)

ख्रिस्ती जीवन

गीत ५९

७. सभेत यहोवाची स्तुती करायचे तीन मार्ग

(१५ मि.) चर्चा.

मंडळीच्या सभांमध्ये यहोवाची स्तुती करायची सर्वात उत्तम संधी आपल्याजवळ असते. त्याचे तीन मार्ग खाली दिले आहेत.

इतरांशी बोलून: इतरांसोबत बोलताना यहोवा किती चांगला आहे याबद्दल बोला. (स्तो १४५:१, ७) तुम्ही असा एखादा मुद्दा ऐकला किंवा वाचला आहे का ज्यामुळे तुम्हाला फायदा झाला आहे? तुम्हाला प्रचारकार्यात चांगला अनुभव आला आहे का? एखाद्या भावाच्या किंवा बहिणीच्या वागण्या-बोलण्यातून तुम्हाला प्रोत्साहन मिळालं आहे का? सृष्टीबद्दल थक्क करून टाकणारी अशी एखादी गोष्ट तुम्हाला कळली आहे का? या सगळ्या गोष्टी यहोवाकडून मिळालेली एक भेटच आहेत. (याक १:१७) त्यांबद्दल इतरांना सांगण्यासाठी तुम्ही सभेला काही मिनिटं लवकर येऊ शकता.

उत्तरं देऊन: प्रत्येक सभेत कमीतकमी एक उत्तर द्यायचा प्रयत्न करा. (स्तो २६:१२) तुम्ही प्रश्‍नाचं एकतर थेट उत्तर देऊ शकता किंवा त्याच्याशी संबंधित मुद्द्‌यावर, वचनावर किंवा चित्रावर उत्तर देऊ शकता. तसंच तो मुद्दा कसा लागू होतो यावरही उत्तर देऊ शकता. तुमच्यासोबत इतर लोकही उत्तरासाठी हात वर करत असतात, त्यामुळे एकापेक्षा जास्त प्रश्‍नांसाठी उत्तर द्यायची तयारी करा. तसंच आपली उत्तरं जर तुम्ही ३० किंवा त्यापेक्षा कमी सेकंदात देऊ शकला तर जास्तीत जास्त लोकांना “देवाला स्तुतीचं बलिदान” अर्पण करता येईल.—इब्री १३:१५.

गीत गाऊन: आवेशाने राज्यगीतं गायचा प्रयत्न करा. (स्तो १४७:१) प्रत्येक सभेत, खासकरून मंडळी मोठी असते तेव्हा तुम्हाला उत्तर द्यायची संधी मिळेलच असं नाही. पण तुम्ही नक्कीच इतरांसोबत मिळून गीत गाऊ शकता. तुम्हाला कदाचित वाटेल, की आपल्याला चांगलं गाता येत नाही. पण तरीसुद्धा जेव्हा तुम्ही जितकं जमेल तितकं चांगलं गायचा प्रयत्न करता तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो! (२कर ८:१२) तुम्ही घरी गीत गायचा सराव करू शकता.

इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये—गीतांची देणगी, भाग १  हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

आपल्या संघटनेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपण हे कसं दाखवून दिलं, की गीत गाऊन यहोवाची स्तुती करणं खूप महत्त्वाचं आहे?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | २०२४ च्या अधिवेशनाचं नवीन गीत आणि प्रार्थना