व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

४-१० मार्च

स्तोत्रं १६-१७

४-१० मार्च

गीत १११ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “यहोवा, माझ्यासाठी सर्व चांगल्या गोष्टींचा उगम” आहे

(१० मि.)

यहोवाची सेवा करणाऱ्‍यांसोबत मैत्री केल्यामुळे आपण आनंदी असतो (स्तो १६:२, ३; टेहळणी बुरूज१८.१२ २६ ¶११)

आपली यहोवासोबत मैत्री असते तेव्हा आपण समाधानी असतो (स्तो १६:५, ६; टेहळणी बुरूज१४ २/१५ २९ ¶४)

यहोवा पुरवत असलेल्या आध्यात्मिक संरक्षणामुळे आपण निर्धास्त राहतो (स्तो १६:८, ९; टेहळणी बुरूज०८ २/१५ ३ ¶२-३)

दावीदप्रमाणेच आपल्याही जीवनाला अर्थ आहे कारण आपल्या जीवनात सर्व चांगल्या गोष्टींचा उगम असणाऱ्‍या देवाच्या म्हणजेच यहोवाच्या सेवेला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे.

स्वतःला विचारा, ‘सत्यात येण्याआधीचं माझं जीवन जसं होतं, त्यापेक्षा आत्ताचं जीवन चांगलं कसं आहे?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १७:८—बायबलमध्ये “तुझ्या डोळ्याच्या बाहुलीसारखं” असं जे म्हटलंय त्याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज२४.०१ २७ ¶६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(१ मि.) घरोघरचं साक्षकार्य. स्मारकविधीचं आमंत्रण द्या. (शिकवणे  अभ्यास ११)

५. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. स्मारकविधीचं आमंत्रण द्या. समोरच्या व्यक्‍तीने आवड दाखवल्यानंतर येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा  या व्हिडिओबद्दल सांगा आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास ९)

६. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(२ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. स्मारकविधीचं आमंत्रण द्या. (शिकवणे  अभ्यास २)

७. शिष्य बनवण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

गीत २०

८. आपण स्मारकविधीची तयारी कशी करू शकतो?

(१५ मि.) चर्चा.

येशूची आज्ञा पाळून आपण रविवार दिनांक २४ मार्चला येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पार पाडणार आहोत. येशूचं बलिदान हे यहोवा आणि येशूच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा आहे. असं प्रेम इतिहासात आजपर्यंत कोणीच दाखवलं नाही. (लूक २२:१९; योह ३:१६; १५:१३) या खास कार्यक्रमासाठी आपण तयारी कशी करू शकतो?

  • खास भाषणाचं आणि स्मारकविधीचं आमंत्रण देण्याच्या मोहिमेत जास्तीत जास्त भाग घ्या. ओळखीच्या लोकांची यादी बनवून त्यांना आमंत्रण द्या. तुम्ही तुमच्या क्षेत्रात राहत नसलेल्या लोकांना jw.org चा वापर करून त्यांच्या क्षेत्रातल्या सभांचा पत्ता आणि वेळ सांगू शकता

  • मार्च आणि एप्रिल महिन्यात सेवाकार्यात जास्तीत जास्त सहभाग घ्या. तुम्ही १५ किंवा ३० तासांची सहायक पायनियर सेवा करू शकता का?

  • पृथ्वीवर असताना येशूच्या जीवनाच्या शेवटल्या आठवड्यात कोणकोणत्या घटना घडल्या त्याबद्दल १८ मार्च पासून तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता. पान ६-७ वर असलेल्या “२०२४ च्या स्मारकविधीसाठी बायबल वाचनाचा आराखडा” यातून दर दिवशी किती वचनं वाचायची हे तुम्ही ठरवू शकता

  • स्मारकविधीच्या दिवशी jw.org वर सकाळच्या उपासनेचा खास कार्यक्रम पाहा

  • स्मारकविधीला आलेल्या नवीन लोकांचं आणि अक्रियाशील प्रचारकांचं प्रेमाने स्वागत करा. कार्यक्रमानंतर त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरं द्या. त्यांची आवड वाढवण्यासाठी त्यांना पुन्हा भेटण्याची योजना करा

  • स्मारकविधीच्या आधी आणि नंतर खंडणी बलिदानावर मनन करा

येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा  हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

स्मारकविधीच्या मोहिमेच्या वेळी आपण या व्हिडिओचा वापर कसा करू शकतो?

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ७३ आणि प्रार्थना