व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

८-१४ एप्रिल

स्तोत्रं २६-२८

८-१४ एप्रिल

गीत ३४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. दावीदने आपला खरेपणा कसा टिकवून ठेवला?

(१० मि.)

दावीदने यहोवाला आपली पारख करायला सांगितलं (स्तो २६:१, २; टेहळणी बुरूज०४ १२/१ १४ ¶८-९)

दावीदने वाईट संगत टाळली (स्तो २६:४, ५; टेहळणी बुरूज०४ १२/१ १५ ¶१२-१३)

दावीदला यहोवाची उपासना प्रिय होती (स्तो २६:८; टेहळणी बुरूज०४ १२/१ १६ ¶१७-१८)


दावीदने चुका केल्या होत्या, तरी तो “खऱ्‍या मनाने” चालला. (१रा ९:४) दावीद मनापासून यहोवाची सेवा करायचा आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचा. यावरून त्याचा खरेपणा सर्वांना दिसून आला.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो २७:१०—जवळचे लोक आपल्याला सोडून जातात, तेव्हा या वचनामुळे आपल्याला कसा दिलासा मिळू शकतो? (टेहळणी बुरूज०६ ८/१ २० ¶१५)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(२ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेली एक पत्रिका द्या. (शिकवणे  अभ्यास ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. मागच्या भेटीत तुम्ही दिलेल्या पत्रिकेच्या शेवटच्या पानावर असलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा. पत्रिकेतून jw.org बद्दल सांगा आणि तिथे कोणती माहिती मिळू शकते याचं एक उदाहरण दाखवा. (शिष्य बनवा  धडा ९ मुद्दा ३)

६. भाषण

(५ मि.) शिष्य बनवा  आणखी माहिती क मुद्दा ३—विषय: पृथ्वीवर पुन्हा कधीच प्रदूषण नसेल. (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

गीत १२९

७. नैतिक बाबतीत आपला खरेपणा टिकवून ठेवणारे तरुण

(१५ मि.) चर्चा.

ख्रिस्ती तरुणांनी नैतिक बाबतीत आपला खरेपणा टिकवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. त्यांना आपल्या अपरिपूर्णतेशी झगडावं लागू शकतं. तसंच, तरुण वयात खासकरून लैंगिक इच्छा खूप तीव्र असल्यामुळे त्यांना योग्य ते करायला कठीण जाऊ शकतं. (रोम ७:२१; १कर ७:३६) याशिवाय, समलिंगी किंवा विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत शारीरिक संबंध ठेवायच्या दबावाचाही त्यांना सतत सामना करावा लागू शकतो. (इफि २:२) अशा कठीण परिस्थितीत, जे आपला खरेपणा टिकवून ठेवतात त्यांचा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान वाटतो!

माझे किशोरवयातले दिवस—लग्नाआधी संबंध ठेवण्याच्या दबावाचा मी सामना कसा करू शकतो?  हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • कॉरी आणि कॅमरीनला सोबत्यांच्या कोणत्या दबावाचा सामना करावा लागला?

  • आपला खरेपणा टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे त्यांना मदत झाली?

  • यांसारख्या परिस्थितींचा सामना करायला कोणत्या बायबल तत्त्वांमुळे तुम्हाला मदत होऊ शकते?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ३८ आणि प्रार्थना