३-९ मार्च
नीतिवचनं ३
गीत ८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. यहोवावर भरवसा असल्याचं दाखवा
(१० मि.)
स्वतःवर नाही, तर यहोवावर भरवसा ठेवा (नीत ३:५; टेहळणी बुरूज११ ११/१५ ६ ¶२-३)
यहोवाकडे मार्गदर्शन मागून आणि ते पाळून त्याच्यावर भरवसा असल्याचं दाखवा (नीत ३:६; टेहळणी बुरूज०३ ९/१ १२-१३ ¶२२-२३)
स्वतःच्या बुद्धीवर जास्त भरवसा ठेवू नका (नीत ३:७; टेहळणी बुरूज१३ ८/१५ १३ ¶१३)
स्वतःला विचारा, ‘जीवनाच्या प्रत्येक पैलूत मी यहोवाचं मार्गदर्शन घेतो का?’
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
-
नीत ३:३—एकनिष्ठ प्रेम आणि विश्वासूपणा यांना आपल्या गळ्याभोवती बांधण्याचा आणि त्यांना आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेवण्याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०६ १०/१ ४ ¶४)
-
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत ३:१-१८ (शिकवणे अभ्यास १२)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. सहसा घेतल्या जाणाऱ्या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ५)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्तीला jw.org वेबसाईटबद्दल सांगा आणि तिला संपर्क कार्ड द्या. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ३)
६. भाषण
(५ मि.) टेहळणी बुरूज११ ३/१५ १४ ¶७-१०—विषय: लोक आवड दाखवत नाहीत तेव्हा देवावर भरवसा असल्याचं दाखवा. (शिकवणे अभ्यास २०)
गीत १२४
७. यहोवाच्या संघटनेवर भरवसा असल्याचं दाखवा
(१५ मि.) चर्चा.
देवाच्या प्रेरित वचनामधल्या, बायबलमधल्या मार्गदर्शनावर भरवसा ठेवणं आपल्याला सोपं जातं. पण जर मार्गदर्शन यहोवाच्या संघटनेत पुढाकार घेणाऱ्या अपरिपूर्ण माणसांकडून मिळत असेल, तर त्यावर भरवसा ठेवायला आपल्याला खूप कठीण जाऊ शकतं; खासकरून ते मार्गदर्शन आपल्याला समजत नाही किंवा पटत नाही तेव्हा.
मलाखी २:७ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
-
यहोवा अपरिपूर्ण माणसांचा वापर करून त्याच्या लोकांना मार्गदर्शन देतो याचं आपल्याला आश्चर्य का वाटत नाही?
मत्तय २४:४५ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
-
यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनावर आपण भरवसा का ठेवू शकतो?
इब्री लोकांना १३:१७ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
-
यहोवा पुढाकार घेणाऱ्या भावांवर भरवसा ठेवतो. मग आपणही त्यांच्या निर्णयांना सहकार्य का केलं पाहिजे?
२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #९—निवडक भाग हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
-
महामारीच्या काळात मिळालेल्या मार्गदर्शनामुळे यहोवाच्या संघटनेवरचा तुमचा भरवसा कसा वाढला आहे?