ईयोब कठीण परीक्षांतही देवाशी एकनिष्ठ राहिला
इस्राएल लोक इजिप्तच्या दास्यत्वात होते तेव्हा ऊस नावाच्या देशात ईयोब राहात होता. तो इस्राएली नव्हता तरीपण यहोवाची एकनिष्ठपणे उपासना करत होता. त्याचं कुटुंब मोठं होतं. त्याच्याजवळ अमाप संपत्ती होती. समाजातील लोक त्याचा आदर करायचे आणि सल्ला विचारायला त्याच्याकडे यायचे. तो न्यायी होता. त्यानं लोकांचं तोंड पाहून कधीच न्याय केला नाही, तर जे प्रामाणिक आहेत अशांना न्याय मिळवून दिला. गरीब आणि गरजू लोकांना तो सढळ हातानं मदत करायचा. तो खरंच प्रामाणिक व देवाशी एकनिष्ठ होता.
यहोवाच आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे, हे ईयोबानं दाखवून दिलं
-
ईयोब एकनिष्ठ व देवाची आज्ञा पाळणारा आहे हे सैतानाच्याही लक्षात आलं. म्हणून त्यानं त्याच्या एकनिष्ठेवर शंका घेतली नाही, तर देवाची सेवा करण्यामागच्या हेतूंवर शंका घेतली
-
ईयोब यहोवाची सेवा स्वार्थी कारणांसाठी करत होता, असा सैतानानं आरोप केला
-
सैतानानं लावलेला आरोप सिद्ध करण्यासाठी यहोवानं त्याला, या विश्वासू माणसावर परीक्षा आणण्याची परवानगी दिली. सैतानानं ईयोबाचं जीवन पार उद्ध्वस्त केलं
-
एवढं सर्व होऊनही ईयोब एकनिष्ठ राहिला, तेव्हा सैतानानं यहोवाच्या इतर सर्व एकनिष्ठ सेवकांवर शंका घेतली
-
ईयोबानं मात्र कुठल्याही बाबतीत पाप केलं नाही किंवा त्याच्यावर आलेल्या या संकटांसाठी देवाला दोष दिला नाही