विश्वासू ईयोब आपलं दुःख व्यक्त करतो
ईयोबावर आलेल्या संकटांमुळं तो कंगाल झाला. मुलं गमावल्यामुळं तो दुःखी झाला होता. भरीत भर म्हणजे त्याला एक भयंकर आजारही झाला. तरीसुद्धा तो यहोवाशी विश्वासू राहिला. तो त्याची एकनिष्ठा सोडत नाही हे पाहून सैतानानं त्याला आता दुसऱ्या पद्धतीनं त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्यावर आलेल्या संकटांमुळं तो निराश झाला आहे हे पाहून, सैतानानं या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्याचे ‘मित्र’ म्हणवणारे तिघं जण त्याला सांत्वन देण्यासाठी आले. ‘तुझी परिस्थिती पाहून आम्हाला खरंच खूप वाईट वाटतंय,’ अशी खोटी सहानुभूती त्यांनी त्याला दाखवली. त्यानंतर ते त्याच्याबरोबर सात दिवस शांतपणे बसून राहिले. ईयोबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांनी तोंडून एकही शब्द काढला नाही. सातव्या दिवसानंतर मात्र त्यांनी त्याच्यावर एकावर एक आरोप लावायला सुरुवात केली.
मानसिक तणावातही ईयोब यहोवाशी एकनिष्ठ राहिला
-
ईयोबावर आलेल्या परिस्थितीमुळं तो अत्यंत दुःखी झाला आणि यामुळं त्याचा दृष्टिकोन बदलला. आपण विश्वासू राहिलो किंवा नाही राहिलो तरी याचा देवाला काही फरक पडत नाही, असा त्यानं चुकीचा समज करून घेतला
-
तो इतका निराश झाला की, आपल्यावर ही संकटं का आली याची इतरही काही कारणं असतील, याचा विचारदेखील त्यानं केला नाही
-
पण, दुःखानं इतकं बेजार झालेलं असतानाही त्यानं, यहोवावर त्याचं प्रेम आहे हे त्याच्यावर आरोप लावणाऱ्यांना बोलून दाखवलं