व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | ईयोब ११-१५

ईयोबाला पुनरुत्थानावर भरवसा होता

ईयोबाला पुनरुत्थानावर भरवसा होता

आपल्याला पुन्हा जिवंत करण्याची शक्ती देवाजवळ आहे, असा विश्वास ईयोबानं व्यक्त केला

१४:७-९, १३-१५

  • आपल्याला पुन्हा जिवंत करण्याची शक्ती देवाजवळ आहे, हा भरवसा व्यक्त करण्यासाठी ईयोबानं एका झाडाचं, कदाचित जैतुनाच्या झाडाचं उदाहरण दिलं

  • जैतुनाच्या झाडाची मुळं खूप दूरपर्यंत पसरत असल्यामुळं, त्या झाडाचं खोड नष्ट झालं तरी त्याला पुन्हा पालवी फुटू शकते. या झाडाची मुळं जिवंत असली, की त्याला नवीन पालवी फुटतेच

  • कडक दुष्काळामुळं, जैतुनाचं झाड कदाचित मरून जाईल. पण जोरदार पाऊस पडतो तेव्हा वाळून गेलेल्या या झाडाच्या बुंध्यापाशी नवीन पालवी फुटते; “नव्या रोप्याप्रमाणे त्यास फांद्या येतात”