व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

खंडणीमुळं पुनरुत्थान शक्य

खंडणीमुळं पुनरुत्थान शक्य

येशूच्या मृत्यूचा स्मारकविधीचा काळ हा, त्यानं दिलेल्या खंडणीमुळं भविष्यात आपल्याला मिळणाऱ्या आशीर्वादांवर मनन करण्यासाठी उत्तम काळ आहे. आणि पुनरुत्थानाची आशा ही या आशीर्वादांपैकी एक आहे. मानवांनी मरावं, अशी यहोवाची कधीच इच्छा नव्हती. त्यामुळंच प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळं होणारं दुःख हे मानवांना सहन करावं लागत असलेलं सर्वात मोठं दुःख आहे. (१करिं १५:२६) लाजरच्या मृत्यूमुळं शिष्यांना झालेलं दुःख पाहून येशूलासुद्धा अतिशय वाईट वाटलं. (योहा ११:३३-३५) कारण येशू, त्याचा पिता यहोवा याचं हुबेहूब प्रतिबिंब आहे. प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळं आपल्याला होणारं दुःख हे यहोवालादेखील जाणवतं. (योहा १४:७) म्हणून, यहोवा जसा त्याच्या विश्वासू सेवकांना पुन्हा जिवंत करण्यास आतुर आहे तसं आपणही त्यांना भेटण्यास आतुर आहोत.—ईयो १४:१४, १५.

यहोवा अव्यवस्था माजवणारा देव नसल्यामुळं पुनरुत्थानसुद्धा टप्प्या-टप्प्यानं व्यवस्थित होईल, अशी आपण खातरी बाळगू शकतो. (१करिं १४:३३, ४०) आताच्या दिवसात अंत्यसंस्कारांची तयारी करावी लागते, परंतु पुनरुत्थानाच्या वेळी प्रिय जनांच्या स्वागतासाठी तयारी करावी लागेल. आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्याचं दुःख हे नेहमीच असतं; पण काही प्रसंगी जेव्हा त्यांची जास्तच आठवण येते, तेव्हा तुम्ही पुनरुत्थानाचा प्रसंग कसा असेल त्याची कल्पना करता का? (२करिं ४:१७, १८) खंडणीची तरतूद केल्याबद्दल आणि पुनरुत्थानाची आशा बायबलमध्ये दिल्याबद्दल तुम्ही यहोवाचे आभार मानता का?—कल ३:१५.

  • पुनरुत्थानाच्या वेळी तुम्ही तुमच्या नातेवाइकांपैकी किंवा मित्रांपैकी खासकरून कुणाला भेटू इच्छिता?

  • बायबलमध्ये ज्यांचा उल्लेख केला आहे त्यांपैकी तुम्ही खासकरून कुणाला भेटू इच्छिता?