व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | एस्तेर ६-१०

यहोवासाठी आणि त्याच्या लोकांसाठी एस्तेरनं निःस्वार्थपणे कार्य केलं

यहोवासाठी आणि त्याच्या लोकांसाठी एस्तेरनं निःस्वार्थपणे कार्य केलं

यहोवा आणि त्याच्या लोकांच्या बाजूनं उभं राहण्यासाठी, एस्तेरनं धैर्य आणि निःस्वार्थीपणा दाखवला

८:३-५, 

  • एस्तेर आणि मर्दखय सुरक्षित होते, पण यहूद्यांची कत्तल करण्याविषयी हामानानं जाहीर केलेल्या हुकुमामुळं, साम्राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या यहुद्यांचा जीव मात्र धोक्यात होता

  • राजानं बोलवलं नव्हतं, तरी एस्तेर आपला जीव धोक्यात घालून त्याला भेटायला गेली. तिला आपल्या लोकांसाठी रडू आलं, आणि त्यानं जाहीर केलेला क्रूर हुकूम रद्द करण्याची तिनं विनंती केली

  • राजानं आपल्या नावानं जाहीर केलेला हुकूम कोणालाच रद्द करता येत नव्हता. म्हणून त्यानं एस्तेर आणि मर्दखयला दुसरा हुकूम जाहीर करण्याची परवानगी दिली

यहोवानं आपल्या लोकांना विजय मिळवून दिला

८:१०-१४, १७

  • यहुद्यांना आपला बचाव करण्याचा हक्क देणारा एक दुसरा हुकूम जाहीर करण्यात आला

  • राजाच्या घोडेस्वारांनी लगेच सर्व साम्राज्यात हा हुकूम कळवला, आणि यहूदी युद्धाची तयारी करू लागले

  • देवाचा यहुद्यांवर आशीर्वाद आहे याचा पुरावा लोकांना मिळाला आणि तेदेखील यहूदी झाले