व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

पाहुण्यांचं स्वागत करा

पाहुण्यांचं स्वागत करा

या वर्षी २३ मार्च रोजी, १ कोटीपेक्षा जास्त लोक स्मारकविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वक्ता आपल्या भाषणात, यहोवानं दिलेल्या खंडणीच्या भेटीबद्दल आणि त्यामुळं भविष्यात मिळणाऱ्या आशीर्वादांबद्दल सांगेल, तेव्हा त्यांना किती जबरदस्त साक्ष मिळेल! (यश ११:६-९; ३५:५, ६; ६५:२१-२३; योहा ३:१६) पण या खास कार्यक्रमात फक्त वक्ताच त्या लोकांना साक्ष देणार नाही. तर आपण सर्वदेखील साक्ष देण्यात सहभागी होऊ शकतो. (रोम १५:७) याबद्दलच्या काही सूचना पुढं पाहा.

  • गेल्या-गेल्या लगेच आपल्या जागेवर बसून कार्यक्रम सुरू होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा, आपण आलेल्या नवीन लोकांचं आणि सत्यात थंड पडलेल्या लोकांचं हसतमुखानं स्वागत करू शकतो

  • आपण ज्यांना स्वतः बोलावलं आहे त्यांच्यावर तर आपण खास लक्ष दिलंच पाहिजे, पण अशा लोकांकडेही लक्ष द्या जे मोहिमेमध्ये मिळालेल्या आमंत्रणामुळं आले आहेत. नवीन लोकांना आपल्यासोबत बसायला बोलवा. आपलं बायबल आणि गीत पुस्तक त्यांना दाखवा

  • भाषण झाल्यानंतर, जर नवीन लोकांना काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं द्या. दुसऱ्या मंडळीच्या कार्यक्रमासाठी हॉल लगेच खाली करायचा असल्यामुळं तुमच्याकडे वेळ कमी असेल, तर काही दिवसांतच त्या व्यक्तीला भेटण्याची योजना करा. तुमच्याकडे तिचा पत्ता किंवा फोन नंबर नसेल तर, तुम्ही तिला विचारू शकता: “कार्यक्रमाबद्दल तुम्हाला कसं वाटलं ते जाणून घ्यायला मला आवडेल. मी तुम्हाला परत भेटू शकतो का?”