सेवाकार्यासाठी तयार व्हा
सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—स्वतःचं सादरीकरण तयार करा
हे का महत्त्वाचं: सभेसाठी कार्यपुस्तिका यातील नमुना सादरीकरणं, तुम्हाला सेवेत उपयोगी पडत असली तरी ती फक्त नमुना म्हणून आहेत. तुम्ही स्वतःच्या शब्दात सादरीकरण तयार केलं पाहिजे. आपल्या स्थानिक गरजेनुसार तुम्ही वेगळा विषय निवडण्याचं किंवा वेगळ्या प्रकारचं सादरीकरण करण्याचंही ठरवू शकता. जर तुम्ही असं करणार असाल तर पत्रिका वाचल्यानंतर, नमुना सादरीकरणावर विचार केल्यावर आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर, खाली सुचवल्याप्रमाणे आपलं सादरीकरण तयार करू शकता.
हे कसं करावं:
तुम्हाला नमुना सादरीकरणांचा वापर करायचा आहे का?
हो
-
सुरुवातीला काय बोलणार त्यावर विचार करा. नमस्ते म्हटल्यानंतर आपल्या येण्याचं कारण थोडक्यात सांगा. (उदाहरणार्थ: “आम्ही एका खास विषयावर तुमच्याशी बोलायला आलो आहोत”.)
-
प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही काय बोलून वचन दाखवाल आणि वचन दाखवल्यानंतर साहित्य कसं सादर कराल, त्यावर विचार करा. (उदाहरणार्थ: प्रश्न विचारल्यावर तुम्ही म्हणू शकता: “या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर, इथं या वचनात आहे”.)
नाही
-
तुम्हाला आणि तुमच्या क्षेत्रातील लोकांना आवडेल असा मुद्दा पत्रिकेतून निवडा
-
घरमालकाला विचार करायला लावेल आणि आपलं मत सांगता येईल असा प्रश्न निवडा. (उदाहरणार्थ: पत्रिकांच्या सुरुवातीला असलेले प्रश्न.) पण त्याला संकोच वाटेल असे प्रश्न टाळा.
-
तुम्ही वाचणार आहात ते वचन निवडा.
-
पत्रिका वाचून काय फायदा होईल, ते थोडक्यात सांगण्याची तयारी करा
काहीही असले तरी
-
पुनर्भेटीत उत्तर देता येईल असा प्रश्न तयार करा
-
पुढच्या वेळी काय बोलायचं आहे ते आठवणीत राहण्याकरता त्या मुद्द्यांची नोंद करून ठेवा