व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नमुना सादरीकरणं

नमुना सादरीकरणं

देवाचे राज्य काय आहे? (T-36)

प्रश्न: आपल्या जीवनात कधी अशी वेळ येईल का, जेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू नसतील, दुःख आणि मरणही नसेल, तुम्हाला काय वाटतं? [घरमालकाने आवड दाखवल्यास पुढे चर्चा करा.] याबद्दल देवाने काय वचन दिलं आहे, ते पाहा.

वचन: प्रकटी. २१:३, ४

सादरता: या पत्रिकेत याविषयी जास्त माहिती दिली आहे.

देवाचे राज्य काय आहे? (T-36)

प्रश्न: सर्वात चांगलं शासन कोणतं असेल, हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? [घरमालकाने आवड दाखवल्यास त्याला वचन वाचून दाखवा.]

वचन: दानी. २:४४

सादरता: ते शासन आपल्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करेल त्याबद्दल या पत्रिकेत समजावलं आहे.

स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका

सादरता: आम्ही लोकांना एका खास कार्यक्रमासाठी आमंत्रित करत आहोत. [घरमालकाला आमंत्रणपत्रिका द्या.] ११ एप्रिलला पूर्ण जगभरात लाखो लोक येशूच्या मृत्यूची आठवण म्हणून एकत्र येणार आहेत. त्याच्या मृत्यूमुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, यावर तिथं एक भाषण दिलं जाईल आणि त्यासाठी पैसे घेतले जाणार नाही. तुमच्या भागात हा कार्यक्रम कुठे आणि कधी होणार आहे, त्याची वेळ आणि पत्ता या आमंत्रणपत्रिकेत दिला आहे. तुम्ही आलात तर आम्हाला खूप आनंद होईल.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.