व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?—कसं वापराल?

यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?—कसं वापराल?

यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत? हे माहितीपत्रक आपल्या शिकवण्याच्या साधनांपैकी एक आहे. विद्यार्थ्यासोबत बायबल अभ्यास करण्याच्या आधी किंवा नंतर चर्चा करण्याच्या उद्देशाने, या माहितीपत्रकाची रचना करण्यात आली आहे. * पाठ १ ते ४ मध्ये यहोवाचे साक्षीदार कसे लोक आहेत हे विद्यार्थ्याला शिकायला मिळेल. तसंच, पाठ ५ ते १४ मध्ये आपल्या कार्यांविषयीची माहिती आणि पाठ १५ ते २८ मध्ये आपल्या संघटनेचं काम कसं चालतं हे विद्यार्थ्याला शिकता येईल. धड्यांच्या क्रमानुसारच त्यांची चर्चा केलेली उत्तम ठरेल पण एखादा विषय विद्यार्थ्याच्या आवडीचा असेल तर त्यावर आधी चर्चा केली तरी चालेल. प्रत्येक पाठ एक पानाचा आहे आणि त्यामुळे त्यावर चर्चा करण्यासाठी शक्यतो पाच ते दहा मिनिटं लागू शकतात.

  • सुरुवातीला विद्यार्थ्यासोबत प्रश्न स्वरूपात असलेल्या पाठाच्या शीर्षकावर चर्चा करा

  • सोबत मिळून पाठाचं वाचन करा, तुम्ही संपूर्ण पाठ सलग किंवा काही भागांमध्येही वाचू शकता

  • वाचलेल्या माहितीवर चर्चा करा. पानाच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांचा आणि दिलेल्या चित्रांचा वापर करा. उल्लेख करण्यात आलेली कोणती वचने तुम्ही वाचाल हे विचारपूर्वक ठरवा आणि त्यावर चर्चा करा. ठळक अक्षरांत दिलेली उपशीर्षकं, मुख्य शीर्षकाशी कशी जुळतात ते सांगा

  • जर पाठात “आणखी जाणून घ्या” ही चौकट असेल तर ती सोबत वाचा आणि त्यात दिलेला सल्ला लागू करण्याचं प्रोत्साहन विद्यार्थ्याला द्या

^ परि. 3 या माहितीपत्रकाची ऑनलाईन आवृत्ती ही सर्वात आधुनिक आवृत्ती आहे.