व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

देवाचे ऐका—कसं वापराल?

देवाचे ऐका—कसं वापराल?

ज्यांना लेखी भाषा समजणं कठीण जातं त्यांना बायबलची मूलभूत सत्यं चित्रांद्वारे समजवता यावी, यासाठी देवाचे ऐका या माहितीपत्रकाची रचना करण्यात आली. प्रत्येक दोन पानांच्या धड्यात खूप विचारपूर्वक रेखाटलेली चित्रं आहेत आणि एका चित्राकडून दुसऱ्या चित्राकडे जाण्यासाठी खुणा दिल्या आहेत, ज्यामुळे चर्चा करण्यासाठी मदत मिळते.

देवाचे ऐका देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! या दोन्ही माहितीपत्रकात सारखीच चित्र आहेत. पण देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! या माहितीपत्रकात देवाचे ऐका पेक्षा जास्त लिखित माहिती आहे. ज्यांना थोडं लिहिता-वाचता येतं, त्यांच्याबरोबर आपण देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! या माहितीपत्रकातून चर्चा करू शकतो. जेव्हा विद्यार्थ्यांचा अभ्यास देवाचे ऐका यातून घेतला जातो तेव्हा अभ्यास घेणारे स्वतः देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! हे माहितीपत्रक सहसा वापरतात. यातल्या बऱ्याच पानांवर चौकटी आहेत, जिथे अधिक माहिती दिली आहे. विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार आपण त्यावर चर्चा करू शकतो.

तुम्ही ही दोन्ही माहितीपत्रकं कोणत्याही महिन्यात सादर करू शकता, म्हणजे जरी ती त्या महिन्याची सादरता नसली तरीही. बायबल अभ्यास घेताना माहितीपत्रकातल्या चित्रांचा उपयोग करून, बायबलमध्ये देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेले अहवाल समजवा. विद्यार्थ्याला चर्चेत सामील करण्यासाठी त्याला प्रश्न विचारा आणि त्याला विषय समजत आहे याची खात्री करा. प्रत्येक पानाच्या शेवटी दिलेली शास्त्रवचनं वाचा आणि त्यावर चर्चा करा. या माहितीपत्रकावर चर्चा करून झाल्यावर तुम्ही बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातून चर्चा करू शकता, ज्यामुळे तुम्ही विद्यार्थ्याला बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्यासाठी मदत करू शकता.