व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

आपल्या कुटुंबाला यहोवाची आठवण ठेवण्यास मदत करा

आपल्या कुटुंबाला यहोवाची आठवण ठेवण्यास मदत करा

यहूद्यांवर येणाऱ्या विनाशाबद्दल त्यांना सावध करण्याची जबाबदारी, यिर्मयावर सोपवण्यात आली होती. कारण ते आपला देव, यहोवा याला विसरले होते. (यिर्म. १३:२५) पण या राष्ट्राची आध्यात्मिक स्थिती इतकी कशी खालावली? कारण इस्राएली कुटुंबांचा आध्यात्मिक दृष्टिकोन हरवला होता. अनुवाद ६:५-७ मध्ये यहोवाने कुटुंबप्रमुखांना दिलेल्या निर्देशनाचं ते पालन करत नव्हते.

आज जर कुटुंबं आध्यात्मिक रीतीने मजबूत असतील तर मंडळ्यादेखील मजबूत होतील. नियमित आणि अर्थपूर्ण कौटुंबिक उपासना केल्यामुळे, कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाला यहोवाची आठवण ठेवायला मदत करू शकतात. (स्तो. २२:२७) या गोष्टी तुझ्या हृदयावर ठसव—कुटुंबाची मुलाखत, हा व्हिडिओ पाहिल्यावर पुढील प्रश्नांची उत्तरं द्या:

  • कौटुंबिक उपासना करण्यासाठी सहसा ज्या समस्या येतात, त्यांवर काही कुटुंबांनी यशस्वी रीतीने कशी मात केली आहे?

  • नियमित आणि अर्थपूर्ण कौटुंबिक उपासना केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात?

  • कौटुंबिक उपासना करण्यासाठी मला कोणत्या समस्या येतात आणि त्यांवर मात करण्यासाठी मी कोणती पावलं उचलू शकतो?