व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया १२-१६

इस्राएली लोक यहोवाला विसरले

इस्राएली लोक यहोवाला विसरले

यहूदा आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्यांच्या गर्वाचा नाश करण्याचा निश्चय यहोवाने केला होता. यिर्मयाला त्याने दिलेल्या कठीण नेमणूकीवरून त्याचा हा निश्चय दिसून आला.

यिर्मयाने कपड्याचा पट्टा विकत घेतला

१३:१, २

  • कमरेला बांधलेला पट्टा, इस्राएल राष्ट्रासोबत यहोवाच्या घनिष्ठ नात्याला सूचित करतो

यिर्मयाने तो पट्टा फरात नदी जवळ नेला

१३:३-५

  • त्याने तो दगडाच्या फटीत लपवून ठेवला आणि त्यानंतर तो यरुशलेमला परतला

यिर्मया तो पट्टा घेण्यासाठी फरात नदी जवळ परत गेला

१३:६, ७

  • तो पट्टा खराब झाला होता

यिर्मयाने ही कामगिरी पूर्ण केल्यावर यहोवाने त्यामागचा अर्थ समजावला

१३:८-११

  • यिर्मयाला जी नेमणूक दिली होती ती जरी क्षुल्लक वाटत असली, तरी त्याने मनापासून दाखवलेल्या आज्ञाधारकतेमुळे, यहोवा आपला संदेश लोकांच्या हृदयापर्यंत पोहचवू शकला