स्लोवीनियामध्ये लोकांना स्मारकविधीचं आमंत्रण देताना

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका मार्च २०१८

चर्चेसाठी नमुने

स्मारकविधीचं आमंत्रण देण्याची मोहीम यावर आधारित चर्चा आणि प्रश्‍न: येशू का मरण पावला? खंडणीमुळे काय साध्य झालं?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“ज्या कोणाला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे”

देवाच्या सेवेतल्या ज्या कामांमुळे लोकांचं लक्ष आपल्याकडे जाईल आणि ते आपली स्तुती करतील अशीच कामं करण्यासाठी आपण जास्त उत्सुक असतो का? एक नम्र सेवक सहसा अशी कार्यं करतो जी सर्वांच्या नजरेत येत नाहीत, तर फक्‍त यहोवाच्याच लक्षात येतात.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञांचं पालन करा

बायबलमध्ये येशूने दिलेल्या दोन सर्वात मोठ्या आज्ञा कोणत्या आहेत? आपण या आज्ञांचं पालन करत आहोत हे कसं दाखवू शकतो?

ख्रिस्ती जीवन

देवावर आणि शेजाऱ्‍यावर प्रेम कसं विकसित कराल?

आपण देवावर आणि आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम केलं पाहिजे. अशा प्रकारचं प्रेम विकसित करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे रोज बायबलचं वाचन करणं.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

शेवटल्या दिवसांत आध्यात्मिक रीत्या जागृत राहा

आज अनेक लोकांनी जीवनातल्या दररोजच्या गोष्टी मिळवण्यासाठी आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आहे. आध्यात्मिक रीत्या जागृत असलेले ख्रिस्ती वेगळे कसे आहेत?

ख्रिस्ती जीवन

या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटी असताना

आपण शेवटल्या काळात जगत आहोत हे येशूच्या शब्दांवरून कसं कळतं? या आणि इतर प्रश्‍नांची उत्तरं ‘या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटी असताना’ या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहेत.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“जागृत राहा”

दहा कुमारींच्या दाखल्यातला वर, समजदार कुमारी आणि मूर्ख कुमारी कोणाला सूचित करतात? या दाखल्यातून तुम्ही काय शिकू शकता?

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—बायबल विद्यार्थ्याला तयारी करायला शिकवणं

सुरुवातीपासूनच आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करण्याची सवय लागावी, म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे. आपण हे कसं करू शकतो?