व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

स्मारकविधीचं आमंत्रण देण्याची मोहीम (३-३१ मार्च): [संवेदनशील असणाऱ्‍या भागात बायबलच्या संदेशात आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीची पुनर्भेट घेताना ही आमंत्रणपत्रिका देऊ शकता. या प्रस्तावनेचा वापर तुम्ही तेव्हा करू शकता.] तुम्ही म्हणू शकता: आम्ही एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी तुम्हाला आमंत्रित करत आहोत. ही आमंत्रणपत्रिका तुमच्यासाठी. शनिवारी, ३१ मार्च रोजी जगभरातील लाखो लोक येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्यासाठी एकत्र येतील. या सभेची वेळ आणि ठिकाण या आमंत्रणपत्रिकेत दिलं आहे. कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात होणाऱ्‍या भाषणाचंही आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहोत. “येशू ख्रिस्त नेमका कोण आहे?” या विषयावर भाषण असेल.

आवड दाखवल्यास पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशू का मरण पावला?

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: येशू का मरण पावला?

वचन: मत्त २०:२८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: खंडणीमुळे काय साध्य झालं?

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: खंडणीमुळे काय साध्य झालं?

वचन: रोम ६:२३

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: आपण खंडणीबद्दल कदर कशी दाखवू शकतो?