व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय २५

“जागृत राहा”

“जागृत राहा”

२५:१-१२

येशूने जरी दहा कुमारींचा दाखला अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना उद्देशून दिला असला तरी, त्यातला मूळ संदेश सर्व ख्रिश्‍चनांना लागू होतो. (टेहळणी बुरूज१५ ३/१५ पृ. १२-१६) “सतत जागृत राहा, कारण तो दिवस आणि ती वेळही तुम्हाला माहीत नाही.” (मत्त २५:१३) येशूने दिलेला दाखला तुम्ही समजावून सांगू शकता का?

  • वर (वचन १)—येशू

  • समजदार, तयारीत असलेल्या कुमारी (वचन २)—असे अभिषिक्‍त ख्रिस्ती जे आपली नेमणूक विश्‍वासूपणे पार पाडण्यासाठी तयार असतात आणि शेवटपर्यंत प्रकाशाप्रमाणे चमकत राहतात (फिलि २:१५)

  • हाक येते: “पाहा, वर येत आहे!” (वचन ६)—येशूच्या उपस्थितीचा पुरावा

  • मूर्ख कुमारी (वचन ८)—त्या अशा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना सूचित करतात ज्या बाहेर जाऊन वराला भेटतात. पण, त्या जागृत नसतात आणि एकनिष्ठा टिकवून ठेवत नाहीत

  • समजदार कुमारी त्यांचं तेल इतरांना देण्यास नकार देतात (वचन ९)—शेवटचा शिक्का मारल्यानंतर विश्‍वासू अभिषिक्‍त जण अविश्‍वासू झालेल्यांना मदत करत नाहीत, कारण खूप उशीर झालेला असतो

  • “वर आला” (वचन १०)—मोठ्या संकटाच्या शेवटी येशू न्याय करण्यासाठी येतो

  • समजदार कुमारी वरासोबत लग्नाच्या मेजवानीला आत जातात आणि दार बंद करण्यात येतं (वचन १०)—येशू त्याच्या विश्‍वासू अभिषिक्‍त जणांना स्वर्गात जाण्यासाठी एकत्रित करतो, पण अविश्‍वासू जण स्वर्गीय जीवनाचं प्रतिफळ गमावून बसतात