व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—बायबल विद्यार्थ्याला तयारी करायला शिकवणं

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—बायबल विद्यार्थ्याला तयारी करायला शिकवणं

हे का महत्त्वाचं: बायबल विद्यार्थ्यांनी तयारी केल्यामुळे शिकवलेल्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आणि त्या आठवणीत ठेवण्यासाठी त्यांना मदत होईल. यामुळे लवकर प्रगती करायलाही त्यांना मदत होईल. “सतत जागृत” राहण्यासाठी त्यांनी बाप्तिस्म्यानंतरही सभांची आणि सेवाकार्याची तयारी करणं गरजेचं आहे. (मत्त २५:१३) अभ्यास कशा प्रकारे करावा हे माहीत असल्यामुळे आणि अभ्यासाचा चांगला नित्यक्रम असल्यामुळे त्यांना आयुष्यभर फायदा होईल. आपण सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना बायबल अभ्यासाच्या तयारीची सवय लावण्यासाठी मदत केली पाहिजे.

हे कसं करावं:

  • स्वतःचं एक चांगलं उदाहरण मांडा. (रोम २:२१) विद्यार्थ्याला लक्षात ठेऊन प्रत्येक अभ्यासाची तयारी करा. (आपली राज्य सेवा ११/१५ पृ. ३) तुमचं प्रकाशन त्यांना दाखवा. यामुळे तुम्ही तयारी कशी करता हे त्यांना समजेल

  • विद्यार्थ्यांना तयारी करण्याचं प्रोत्साहन द्या. बायबल अभ्यास सुरू होतो, तेव्हा विद्यार्थ्याला सांगा की तयारी करणं हासुद्धा बायबल अभ्यासाचाच एक भाग आहे आणि त्याच्या फायद्यांविषयीही त्याला सांगा. तयारीसाठी वेळ काढण्याच्या बाबतीत तुम्ही त्याला काही व्यावहारिक सल्ले देऊ शकता. बायबल अभ्यासाच्या वेळी काही प्रचारक, विद्यार्थ्याला खुणा केलेलं आपलं प्रकाशन वापरायला देतात. यामुळे तयारी करण्याचे कोणते फायदे आहेत हे विद्यार्थी पाहू शकतो. जेव्हा बायबल विद्यार्थी तयारी करतो तेव्हा त्याची प्रशंसा करा

  • तयारी कशी करावी हे विद्यार्थ्याला दाखवा. काही प्रचारक बायबल अभ्यासाच्या पहिल्या दिवशी अभ्यास घेत नाहीत. त्याऐवजी अध्यायाची तयारी कशी करावी हे दाखवतात