व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी​—चांगलं पत्रलेखन

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी​—चांगलं पत्रलेखन

हे का महत्त्वाचं आहे: आपल्यासोबतच्या ख्रिस्ती बंधुभगिनींना उत्तेजन देण्यासाठी प्रेषित पौलने १४ पत्रं लिहिली. १ करिंथकर हे पुस्तक त्यापैकीच एक पत्र आहे. पत्र लिहिणाऱ्‍या व्यक्‍तीकडे योग्य शब्दांची निवड करण्यासाठी पुरेसा वेळ असतो आणि पत्र वाचणारा ते पुन्हा-पुन्हा वाचू शकतो. नातेवाइकांना आणि ओळखीच्या लोकांना साक्ष देण्यासाठी पत्रलेखन एक चांगला पर्याय आहे. तसंच आपण पत्राद्वारे अशा लोकांनाही साक्ष देऊ शकतो ज्यांना आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही. उदाहरणार्थ, पत्राद्वारे आवड दाखवणाऱ्‍या अशा व्यक्‍तीला मदत दिली जाऊ शकते जिला घरी भेटणं शक्य नाही. तसंच आपल्या क्षेत्रात अशी घरं असतील जिथे कडक सुरक्षा असल्यामुळे आपल्याला प्रचार करण्याची परवानगी दिली जात नाही. किंवा अशीही काही क्षेत्र असतात जिथे आपण पोहचू शकत नाही. मग पत्र लिहिताना, खासकरून अनोळखी व्यक्‍तीला पत्र लिहिताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो?

हे कसं करता येईल:

  • ती व्यक्‍ती समोर असती तर तुम्ही तिच्याशी जसं बोलला असता, तसंच लिहिण्याचा प्रयत्न करा. पत्राच्या सुरुवातीलाच स्वतःची ओळख द्या आणि पत्र लिहिण्याचं कारण स्पष्ट करा. त्यानंतर त्या व्यक्‍तीला विचार करायला लावणारा एखादा प्रश्‍न पत्रात लिहा आणि आपल्या वेबसाईटबद्दल तिला सांगा. वेबसाईटवर असलेल्या ऑनलाईन बायबल स्टडी लेसन्सच्या (सध्या मराठीत उपलब्ध नाही) सुविधेबद्दलही त्या व्यक्‍तीला सांगा. तसंच गृह बायबल अभ्यासाच्या योजनेबद्दल तिला सांगा किंवा आपण ज्या प्रकाशनांमधून बायबल अभ्यास चालवतो त्यातल्या एका प्रकाशनातील धड्यांचे विषय पत्रात लिहा. यासोबतच तुम्हाला एखादं संपर्क कार्ड, आमंत्रणपत्रिका किंवा एखादी पत्रिकासुद्धा पत्रासोबत जोडता येईल

  • पत्रात तुमचे मुद्दे थोडक्यात मांडा. यामुळे वाचणाऱ्‍याला कंटाळा येणार नाही.​—पत्राचा नमुना पाहा

  • पत्रात काही चुका नाहीत आणि ते सहजपणे वाचता येईल याची खातरी करा. तसंच, पत्र त्या व्यक्‍तीला मैत्रीपूर्वक, विचार करून लिहिलेलं आणि सकारात्मक वाटेल याचीही खातरी करून घ्या