व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ करिंथकर १-३

तुम्ही आध्यात्मिक विचारसरणी बाळगता, की शारीरिक विचारसरणी?

तुम्ही आध्यात्मिक विचारसरणी बाळगता, की शारीरिक विचारसरणी?

२:१४-१६

आपण सर्वांनीच आध्यात्मिक मनोवृत्तीचं असलं पाहिजे. पण त्यासोबतच आपण ही मनोवृत्ती वाढवत राहण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. (इफि ४:२३, २४) ही प्रगती करण्यासाठी आपण आध्यात्मिक आहार घेऊन स्वतःचं पोषण केलं पाहिजे, वेगवेगळी आध्यात्मिक ध्येयं ठेवली पाहिजेत आणि स्वतःमध्ये आत्म्याच्या फळाचे पैलू विकसित केले पाहिजेत.

एक वर्षाआधी, दहा वर्षांआधी किंवा बाप्तिस्म्याच्या वेळी तुमची जी आध्यात्मिक स्थिती होती, तिच्या तुलनेत तुमची आजची आध्यात्मिक स्थिती कशी आहे?