व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

नमुना पत्र

नमुना पत्र
  • पत्रात तुमच्या घरचा पत्ता वापरा. जर स्वतःच्या घरचा पत्ता देणं योग्य वाटत नसेल, तर मंडळीतील वडिलांची परवानगी घेऊन तुम्हाला राज्य  सभागृहाचा पत्ता वापरता येईल. पण कोणत्याही परिस्थितीत पत्रव्यवहारासाठी आपल्या शाखा कार्यालयाचा पत्ता वापरू नका.

  • शक्य असेल तर घरमालकाच्या व्यक्‍तिगत नावाचा वापर करा. त्यामुळे आपलं पत्र व्यावसायिक जाहिरातीचा भाग आहे, असं वाटणार नाही.

  • शब्दरचना, व्याकरण आणि विरामचिन्हांचा योग्य वापर करण्याबद्दल काळजी घ्या. पत्रात खाडाखोड न करता ते सुटसुटीत लिहिण्याचा प्रयत्न करा. तसंच पत्र सुवाच्य अक्षरांत लिहिण्याचा प्रयत्न करा. पत्र लिहिताना जी भाषा वापराल त्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करा; ती अगदीच औपचारिक नसावी.

नमुना म्हणून दिलेल्या पत्रात वरील मुद्दे लागू करण्यात आले आहेत. तरी क्षेत्रातल्या एखाद्या व्यक्‍तीला पत्र लिहिताना, प्रत्येक वेळी या पत्राची हुबेहूब नक्कल केली जावी असा याचा अर्थ होत नाही. तर स्थानिक पद्धत व परिस्थितीनुसार आणि हेतू लक्षात घेऊन तुम्ही पत्र लिहू शकता.