व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ करिंथकर ४-६

“थोडेसे खमीरसुद्धा पिठाच्या संपूर्ण गोळ्याला फुगवते”

“थोडेसे खमीरसुद्धा पिठाच्या संपूर्ण गोळ्याला फुगवते”

५:१, २, ५-११, १३

मंडळीतून एखाद्याला बहिष्कृत केलं जातं, तेव्हा भावनिक रीत्या ही गोष्ट खूप वेदना देणारी असते. पण मग तरीही ती एक प्रेमळ तरतूद आहे, असं का म्हणता येईल?

कारण एखाद्याला बहिष्कृत केलं जातं तेव्हा . . .

  • यहोवाच्या पवित्र नावाचा गौरव करण्याद्वारे आपण त्याच्यावरचं आपलं प्रेम दाखवत असतो.​—१पेत्र १:१५, १६

  • वाईट प्रभावांपासून मंडळीचं रक्षण करण्याद्वारे मंडळीबद्दलचं आपलं प्रेम व्यक्‍त होत असतं.​—१कर ५:६

  • चूक करणाऱ्‍याला ताळ्यावर येण्याकरता मदत करण्याद्वारे आपण त्याच्यावर असलेलं आपलं प्रेम दाखवत असतो.​—इब्री १२:११

मग बहिष्कृत व्यक्‍तीच्या कुटुंबातील ख्रिस्ती सदस्यांना तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता?