व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | रोमकर १२-१४

ख्रिस्ती प्रेम दाखवण्याचा काय अर्थ होतो?

ख्रिस्ती प्रेम दाखवण्याचा काय अर्थ होतो?

१२:१०, १७-२१

एखादी व्यक्‍ती आपल्याशी चुकीचं वागते तेव्हा तिलाही तशीच वागणूक देण्यापासून आपण स्वतःला आवरतो. आणि असं केल्यामुळे आपण आपलं ख्रिस्ती प्रेम दाखवतो. पण ख्रिस्ती प्रेम केवळ एवढ्यावरच थांबत नाही, तर ते त्याहून पुढे जाऊन आणखी काहीतरी करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतं. “तुझा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खायला दे; तो तहानलेला असेल, तर त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या डोक्यावर निखाऱ्‍यांचा ढीग ठेवशील.” (रोम १२:२०) आपल्याशी वाईट वागणाऱ्‍यासोबत आपण चांगलं वागतो तेव्हा त्याच्या वागण्याचा नंतर त्याला पस्तावा होऊ शकतो.

जर तुमच्याकडून चुकून एखाद्याचं मन दुखवलं गेलं असेल आणि तरीही तो तुमच्याशी दयेने वागत असेल, तर तुम्हाला कसं वाटेल?