१६-२२ मार्च
उत्पत्ति २५-२६
गीत ५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“एसाव आपला जेष्ठत्वाचा हक्क विकतो”: (१० मि.)
उत्प २५:२७, २८—एसाव आणि याकोब जरी जुळे भाऊ असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि त्यांच्या आवडी-निवडींमध्ये फरक होता (बायबल कथा कथा १७)
उत्प २५:२९, ३०—भूक आणि शारीरिक थकव्याला एसावने स्वतःवर नियंत्रण करू दिलं
उत्प २५:३१-३४—एसावने फक्त एक वेळच्या जेवणासाठी कोणतीही कदर न बाळगता, अगदी अविचारीपणे आपला प्रथमपुत्राचा हक्क याकोबला विकला (टेहळणी बुरूज१९.०२ पृ. १६ परि. ११; इन्साइट-१ पृ. ८३५)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
उत्प २५:३१-३४—मसीहाची वंशावळ प्रथमपुत्राच्या हक्कावर आधारलेली होती असा निष्कर्ष या अहवालातून का निघत नाही? (इब्री १२:१६; टेहळणी बुरूज१७.१२ पृ. १५ परि. ५-७)
उत्प २६:७—या घटनेत इसहाकने खरी गोष्ट पूर्णपणे का सांगितली नाही? (इन्साइट-२ पृ. २४५ परि. ६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प २६:१-१८ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या पुनर्भेटीची व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: प्रश्नाचं उत्तर माहीत नसल्यामुळे घरमालकाला अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून आपण काय करायचं टाळू शकतो? प्रचारकाने मत्तय २०:२८ वर कशा प्रकारे तर्क केला?
पहिली पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ३)
पहिली पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि बायबलमधून शिकायला मिळतं हे पुस्तक द्या. (शिकवणे अभ्यास १५)
ख्रिस्ती जीवन
देवाकडून आनंदाची बातमी! या माहितीपत्रकातून लोकांसोबत अभ्यास करताना व्हिडिओचा वापर करा: (१५ मि.) चर्चा. मृत लोकांची काय अवस्था आहे? आणि देवाने दुःख का राहू दिलं? हे व्हिडिओ दाखवा. प्रत्येक व्हिडिओ दाखवल्यानंतर पुढे दिलेले प्रश्न विचारा: आनंदाची बातमी या माहितीपत्रकातून अभ्यास करताना तुम्ही या व्हिडिओचा वापर कशा प्रकारे करू शकता? (सभेसाठी कार्यपुस्तिका१९.०३ पृ. ७) या व्हिडिओतल्या कोणत्या गोष्टींचा तुम्हाला शिकवताना फायदा झाला आहे? आनंदाची बातमी या माहितीपत्रकाच्या डिजिटल आवृत्तीत व्हिडिओच्या लिंकसुद्धा आहेत, याची सर्वांना आठवण करून द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या! पाठ ९-११
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ५२ आणि प्रार्थना