३० मार्च–५ एप्रिल
उत्पत्ति २९-३०
गीत २० आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“याकोब लग्न करतो”: (१० मि.)
उत्प २९:१८-२०—राहेलशी लग्न करण्यासाठी याकोब सात वर्षं लाबानची चाकरी करायला तयार होतो (टेहळणी बुरूज०३ १०/१५ पृ. २९ परि. ६)
उत्प २९:२१-२६—लाबानने याकोबला फसवून त्याचं लग्न लेआसोबत लावलं (टेहळणी बुरूज०७-E १०/१ पृ. ८-९; इन्साइट-२ पृ. ३४१ परि. ३)
उत्प २९:२७, २८—कठीण परिस्थितीतही याकोब निराश झाला नाही
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
उत्प ३०:३—याकोब आणि बिल्हा यांना झालेल्या मुलांना राहेलने आपली मुलं म्हणून का स्वीकारलं? (इन्साइट-१ पृ. ५०)
उत्प ३०:१४, १५—राहेलने काही पुत्रदात्रीच्या फळांच्या बदल्यात गरोदर होण्याची संधी का जाऊ दिली असावी? (टेहळणी बुरूज०४ १/१५ पृ. २८ परि. ६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प ३०:१-२१ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. उत्तेजन देणारं आणि सकारात्मक हा व्हिडिओ दाखवा आणि शिकवणे माहितीपत्रकाच्या अभ्यास १६ वर चर्चा करा.
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ५ परि. २१-२२ (शिकवणे अभ्यास १८)
ख्रिस्ती जीवन
“सेवाकार्यातली आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—अंध लोकांना साक्ष देणं”: (१० मि.) सेवा पर्यवेक्षकांद्वारे चर्चा. पुढे दिलेले प्रश्न विचारा: अंध लोकांनाही साक्ष देणं का गरजेचं आहे? अंध लोकांना आपण कुठे शोधू शकतो? आपल्याला त्यांच्यात आवड असल्याचं आपण कशा प्रकारे दाखवू शकतो? आध्यात्मिक रीत्या प्रगती करता यावी म्हणून अंध लोकांसाठी कोणती साधनं उपलब्ध आहेत?
संघटनेची कामगिरी: (५ मि.) मार्च महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या! पाठ १५-१७
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत २४ आणि प्रार्थना