याकोब लग्न करतो
लग्नामुळे आपल्याला कोणकोणत्या परीक्षांचा सामना करावा लागेल याची याकोबला कल्पना नव्हती. राहेल आणि लेआ या दोघी एकमेकींच्या शत्रू बनल्या. (उत्प २९:३२; ३०:१, ८) पण परीक्षांचा सामना करत असतानाही यहोवा आपल्यासोबत आहे, हे याकोबने पाहिलं. (उत्प ३०:२९, ३०, ४३) शेवटी त्याचे वंशज इस्राएल राष्ट्र बनले.—रूथ ४:११.
आपल्या काळात जे लोक लग्न करतात त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागतोच. (१कर ७:२८) पण जर ते मार्गदर्शनासाठी यहोवावर आणि बायबलच्या तत्त्वांवर अवलंबून राहिले तर ते आपला विवाह यशस्वी बनवू शकतात आणि आनंदी राहू शकतात.—नीत ३:५, ६; इफि ५:३३.