व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

कोणाकोणाला आमंत्रण द्यायचं?

कोणाकोणाला आमंत्रण द्यायचं?

आपल्या भागातल्या अनोळखी लोकांनी आपल्यासोबत स्मारकविधीला उपस्थित राहावं, म्हणून दरवर्षी त्यांना आमंत्रण देण्यासाठी आपण खूप मेहनत घेत असतो. पण त्यासोबतच आपण आपल्या ओळखीच्या लोकांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं पाहिजे. कारण ओळखीचे लोक असतील तर त्यांची कार्यक्रमाला येण्याची जास्त शक्यता असते. (इयरबुक०८ पृ. ११ परि. ३; पृ. १४ परि. १) मग असे कोणते ओळखीचे लोक आहेत, ज्यांना तुम्ही या कार्यक्रमाचं आमंत्रण देऊ शकता?

  • नातेवाईक

  • सहकर्मचारी किंवा वर्गसोबती

  • शेजारी

  • तुमच्या पुनर्भेटी आणि तुमचे पूर्वीचे व सध्याचे बायबल विद्यार्थी

यासोबतच, मंडळीतले वडील अक्रियाशील प्रचारकांना आमंत्रण देतील. पण तुमच्या ओळखीची एखादी व्यक्‍ती जर तुमच्या भागात राहत नसेल तर काय? असं असेल तर त्या व्यक्‍तीला जवळ पडेल अशा ठिकाणी होणाऱ्‍या स्मारकविधीच्या कार्यक्रमाचं ठिकाण आणि वेळ तुम्हाला शोधता येईल. त्यासाठी तुम्ही jw.org वेबसाईटवर, वरच्या बाजूला दिलेल्या ‘आमच्याविषयी’ या टॅबवर क्लिक करून, “स्मारकविधी” असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता. या वर्षीच्या स्मारकविधीसाठी तयारी करताना, कोणा-कोणाला आमंत्रण देता येईल याचा विचार करा आणि त्यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण द्या.