व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

कुटुंबातल्या सदस्यांवर प्रेम करा

कुटुंबातल्या सदस्यांवर प्रेम करा

प्रेम एक अशी गोष्ट आहे, जी कुटुंबातल्या सदस्यांना एकत्र बांधून ठेवते. प्रेम नसेल, तर कुटुंबात एकी राहणार नाही आणि कुटुंबातले सदस्य एकमेकांची साथ देणार नाहीत. तर मग पती-पत्नी आणि आईवडील कुटुंबात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी काय करू शकतात?

आपल्या पत्नीवर प्रेम करणारा पती, तिच्या गरजा पूर्ण करतो आणि तिच्या भावनांचा विचार करतो. (इफि ५:२८, २९) तो आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्याही सर्व गरजा पूर्ण करतो, त्यांना यहोवासोबत जवळचं नातं टिकवून ठेवायला मदत करतो आणि दर आठवड्याला कौटुंबिक उपासनाही घेतो. (१ती ५:८) जी पत्नी आपल्या पतीवर प्रेम करते, ती त्याच्या अधीन राहते आणि त्याचा “मनापासून आदर” करते. (इफि ५:२२, ३३; १पेत्र ३:१-६) पती-पत्नी नेहमी एकमेकांना माफ करायला तयार असतात. (इफि ४:३२) जे आईवडील आपल्या मुलांवर प्रेम करतात, ते आपल्या प्रत्येक मुलाची काळजी घेतात आणि त्यांना यहोवावर प्रेम करायला शिकवतात. (अनु ६:६, ७; इफि ६:४) ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतात की शाळेत मुलांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यांच्यावर दबाव येतो तेव्हा त्याचा सामना ते कसा करतात? कुटुंबात प्रेम असतं तेव्हा सर्व सदस्यांना सुरक्षित वाटतं.

कुटुंबात कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • एक प्रेमळ पती कसं दाखवू शकतो, की त्याला आपल्या पत्नीच्या भावनांची काळजी आहे?

  • एक प्रेमळ पत्नी आपल्या पतीचा “मनापासून आदर” कसा करू शकते?

  • जे आईवडील आपल्या मुलांवर प्रेम करतात ते त्यांना देवाच्या वचनानुसार वागायला कसं शिकवू शकतात?