व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

मुख्य मुद्दे समजावण्यासाठी उदाहरणं द्या

मुख्य मुद्दे समजावण्यासाठी उदाहरणं द्या

पुनर्भेट किंवा बायबल अभ्यास घेताना, मुख्य मुद्दे समजावून सांगायचा प्रयत्न करा. असं केल्यामुळे मुख्य मुद्दे ऐकणाऱ्‍याच्या मनापर्यंत पोचतील आणि त्यांच्या लक्षातही राहतील.

पुनर्भेट किंवा बायबल अभ्यास घेताना, बारीकसारीक माहिती स्पष्ट करण्यापेक्षा सगळ्यात आधी मुख्य मुद्दे कोणते आहेत, ते पाहा. मग हे मुद्दे समजावण्यासाठी दररोजच्या जीवनातली कोणती सोपी उदाहरणं देता येतील ते पाहा. (मत्त ५:१४-१६; मार्क २:२१; लूक १४:७-११) विद्यार्थ्याची परिस्थिती कशी आहे आणि त्याला कोणत्या गोष्टीत आवड आहे, हे पाहून उदाहरणं निवडा. (लूक ५:२-११; योह ४:७-१५) तुम्ही सांगितलेला मुद्दा विद्यार्थ्याला समजलाय, हे जेव्हा त्याच्या चेहऱ्‍यावर दिसेल तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल.

शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—मुख्य मुद्दे समजावण्यासाठी उदाहरणं देऊन  हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • विद्यार्थ्याला वचन समजावून सांगणं का गरजेचं आहे?

  • निताने रोमकर ५:१२ हे वचन कसं समजावून सांगितलं?

  • चांगली उदाहरणं मनाला स्पर्श करतात

    चांगल्या उदाहरणाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यावर त्याचा कसा परिणाम होतो?

  • प्रचारकार्यात आपण संघटनेकडून मिळालेल्या व्हिडिओंचा आणि इतर साधनांचा वापर का केला पाहिजे?