ख्रिस्ती जीवन
दारू पिण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा
दारू पिण्याच्या बाबतीत आपण संयम बाळगला पाहिजे. (नीत २३:२०, २९-३५; १कर ६:९, १०) एका ख्रिस्ती व्यक्तीने दारूच सेवन करताना मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे. तसंच तिला दारूची सवय नसली पाहिजे आणि आपल्यामुळे इतर जण अडखळणार नाहीत याचीही तिने काळजी घेतली पाहिजे. (१कर १०:२३, २४; १ती ५:२३) आपण कोणालाही आणि खासकरून तरूण मुलांना, दारू पिण्याची जबरदस्ती करू नये.
दारू पिण्याआधी करा विचार हे बोर्डवरचं कार्टून दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा:
-
दारू पिण्याबद्दल शासनाने घालून दिलेले नियम ख्रिश्चनांनी का पाळले पाहिजेत?—रोम १३:१-४
-
तुमच्यावर जर कोणी दारू पिण्याची जबरदस्ती केली, तर तुम्ही नाही का म्हटलं पाहिजे?—रोम ६:१६
-
दारूमुळे होणारे वाईट परिणाम तुम्ही कसे टाळू शकता?